Viral video: तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.
माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होतेच. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो, तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.
तर झालं असं की, नेहमीच्या पुलावरून एक व्यक्ती घरी जाण्यासाठी आली, पण पावसामुळे त्या पुलावरून पाणी वाहत होतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुलावरून हे पाणी वाहत आहे. मात्र, पाण्याला फारसा जोर सुरुवातीला दिसत नसल्यानं या व्यक्तीने त्या पाण्यातून त्याची गाडी काढण्याचा निर्णय घेतला अन् गेला. मात्र, पुलाच्या मधोमध पोहचताच पाण्याचा जोर वाढला अन् व्यक्तीला गाडी पुढे घेऊन जाण्यास अडथळा येऊ लागला. ती व्यक्ती आणि त्याची गाडी त्या पाण्याच्या प्रवाहात ओढली जाऊ लागली. मात्र, या व्यक्तीने प्रयत्नाने गाडी पुलावरून पुढे नेली आणि बघता बघता पूरच आला. केवळ काही सेकंदातच तो पूलही वाहून गेला. ही व्यक्ती या घटनेत थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: सुसाट गाड्यांमध्ये उलट्या दिशेने आला अन् एका मागोमाग अपघातांचा थरार; मदत करायची सोडून केलं असं काही…
हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सावधगिरी बाळगली, तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वत:ला तसेच इतरांना वाचवू शकता. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय” नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे पाहाव.”