Heart Touching Video : आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात की, त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नाही. यावेळी आयुष्य थांबलेय की काय, असे वाटू लागते. अशा वेळी खूप रडून कुणाकडे तरी आपले दु:ख व्यक्त करण्याची इच्छा होते. काही जण खूप टोकाचे निर्णय घेतात. पण, असे करण्याआधी थोडा विचार करा. कारण- तुमच्या आजाबाजूला असे अनेक लोक आहेत की, ज्यांना देवाने तुमच्यापेक्षा खूप कमी गोष्टी दिल्यात; पण त्यातही ते खूश राहून आयुष्य जगतायत. सध्या सोशल मीडियावरही अशाच एका अपंग चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आयुष्यात जर कधी हरल्यासारखे वाटले ना, तर हा व्हिडीओ तुम्हालाही जीवन जगण्याचे ध्येय देईल.

कठीण परिस्थितीतही चिमुकली हसत खेळत जगतेय आयुष्य

हा व्हिडीओ नैराश्यात जगणाऱ्या मंडळींना जगण्याचे सार सांगणारा आहे. सध्याचे तणावपूर्ण आयुष्य, जास्त पगाराची अपेक्षा, कुटुंबातील वादविवाद व जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी सांभाळताना काही जण नैराश्येच्या गर्तेत अडकतात. पण, म्हणतात ना माणूस शरीराने वा तर विचाराने कमकुवत, हताश झाला असेल ना, तर तो आयुष्यात कधीच आनंदी राहू शकत नाही; पण तुमचे विचार जर सकारात्मक असतील ना, तर तुम्ही कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढत तुमचा आनंद शोधू शकता, आयुष्य सुंदर पद्धतीने जगू शकता. असाच मेसेज या व्हिडीओतील चिमुकलीने दिला आहे.

चिमुकलीला एक हात अन् दोन्ही पाय नाहीत पण…

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक हात आणि दोन्ही पाय नसतानाही एक चिमुकली अगदी आनंदात हसते, खेळतेय. इतर लहान मुलांप्रमाणे तिलाही दुडुदुडु धावत आपल्या खेळण्यांबरोबर खेळण्याची इच्छा आहे; पण शारीरिक अपंगत्वामुळे ती ते करू शकत नाही, अशा परिस्थितीतही निराश न होता, ती अगदी हसून आयुष्य जगतेय. पलटी घेत ती आपल्या खेळण्यांपर्यंत पोहोचतेय. हा व्हिडीओ पाहून आयुष्यात जे नाही, त्याचं दु:ख करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याची किंमत करायला शिका…

ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल

हा व्हिडीओ @shreee_shiiv या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी चिमुकलीबाबत दु:ख व्यक्त केले आहे. या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंट केली, “सगळं असूनसुद्धा देवाकडे तक्रार करतो. हे बघून जीवन जगण्याचं ध्येय मिळालं.” त्यावर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, “देवा, तू ज्याला देतो त्याला त्याची किंमत नसते. ज्याला जास्त गरज आहे, त्याला का देत नाहीस तू.” दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवरून दु:ख व्यक्त केले आहे.