सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या आश्चर्यकारक आणि दुर्मिळ गोष्टी व्हायरल होत असतात. शिवाय सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात जास्त प्राण्यांचा समावेश असल्याचं आपणाला पाहायला मिळतं. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये आपणाला प्राण्यांची विविध रुप पाहायला मिळतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा फोटो झाडाच्या फांदीवर निवांत झोपलेल्या एका बिबट्याचा आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक बिबट्या झाडाच्या फांदीवर झोपलेला दिसत आहे. बिबट्या इतका बेसावध झोपलेला पाहून तो खूप थकला असल्याचं जाणवत आहे. या फोटोत बिबट्या आपले चारही पाय झाडाला लटकवून झोपला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बिबट्या आपलं डोकंही झाडाच्या फांदीमध्ये लटकवलं आहे. शिवाय बिबट्याने मागचे दोन पाय एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळे सतत धावपळ करणाऱ्या बिबट्याचे असले रुप याआधी कधीही पाहिलं नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, स्वत:ला स्वत:समोर सिद्ध करा, करा इतरांसमोर नव्हे. या फोटोला आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे, तर दोन हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. अनेकांनी या फोटोवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘बिबट्याला इतकं निवांत आणि बेसावध पहिल्यांदाच पाहिलं आहे, कारण तो एवढा शांत कधी नसतोच.’