आपल्यापैकी प्रत्येकाने शालेय जिवनामध्ये हस्ताक्षर स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल. अनेक शाळांमध्ये ही स्पर्धा सक्तीची असल्याने सर्वच मुलांना एक पानभर तरी आपल्या हस्ताक्षराचे प्रदर्शन मांडावे लागते. या स्पर्धेची अचानक आठवण होण्याचं कारण म्हणजे सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ…या व्हिडीओमधली कॅलिग्राफी पाहिल्यानंतर ही प्रिटींग मशीनची छपाई आहे की काय असा भास होऊ लागतो.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ तनसू येगेनने ट्विटरवर शेअर केला आहे. छोट्याश्या व्हिडीओमध्ये दाखवलेली कॅलिग्रॅफीची कला पाहताना डोळे अगदी सुखावून जातात. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पूर्णपणे सुंदर कॅलिग्राफी करताना दिसत आहे. ती व्यक्ती ज्या पद्धतीने लिहित होती ते पाहताना अतिशय समाधानकारक आणि आनंददायी वाटू लागते. जर तुम्ही सर्वच कलेच्या सौंदर्याचे प्रेमी असाल, तर तुम्हाला ही कॅलिग्राफी देखील नक्कीच आवडेल.
हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘कॅलिग्राफी ही एक कला का आहे याचा पुरावा’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यातील एक एक अक्षर अगदी मोत्यांप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर दिसतोय. लॅपटॉप आणि मोबाईलवरील किपॅडच्या युगात ही कॅलिग्राफी पाहून सारेच जण अचंबित होऊ लागले आहेत. ही कॅलिग्राफी प्रिटींग मशीनच्या छपाई सुद्धा मागे टाकतेय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सिंहाच्या छाव्याला ओंजारत गोंजारत होता, मग काय पुढे जे केलं त्यामुळे जन्माची अद्दल घडली!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : झोपलेल्या वाघाला उठवायला गेली ही मुलगी, पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ६.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओखालील कमेंट सेक्शनमध्ये कॅलिग्राफीचं कौतूक करताना दिसत आहेत.