Auto Rickshaws Funny Advertisement Video : ऑटो, ट्रक किंवा बस किंवा बाइक्सच्या मागील अनेक मजेशीर शायरी, कोट्स किंवा अनेक प्रकारच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. ज्या क्षणातच लोकांचे लक्ष वेधून घेतात. काही कोट्स किंवा जाहिराती फार विचार करायला लावणाऱ्या असतात; तर काही पोट धरून हसण्यास भाग पाडतात. अशाच प्रकारे ऑटोरिक्षाच्या मागे लिहिलेल्या जाहिरातीचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यातील रिक्षाच्या मागील जाहिरात वाचून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. या रिक्षाचालकाने मजेशीर पद्धतीने आपल्या कामाची जाहिरात केली आहे. ही जाहिरात तर मजेशीर आहेच; पण त्यात लिहिलेल्या ओळीही तुम्हालाही विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.
रिक्षा चालकाने लोकांच्या दुखात शोधला कमाईचा नवा फंडा
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ऑटोच्या मागे काही मजेशीर लाइन्स लिहिल्या आहेत. जेव्हा तुम्ही त्या लाइन्स वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की, या ऑटोचालकाने आपल्या कामाची मजेशीर जाहिरात केली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा रिक्षाचालक रिक्षा चालविण्याबरोबर आणखी कोणते दुसरे काम करीत असेल बाबा? ज्याचे तो त्याच्या रिक्षावरील जाहिरातीद्वारे प्रमोशन करत आहे. तर हा रिक्षाचालक लोकांच्या दुःखात साथ देण्याचे काम करतो. त्याच्या ऑटोमध्ये बसून तुम्ही आरामात तुमच्या भावना व्यक्त करू शकता आणि यात तो तुम्हाला पूर्ण साथ देईल. गरज पडल्यास तो रडण्यासाठी तुम्हाला खांदाही देईल. पण, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला त्याला काही फी द्यावी लागेल. आहे ना मजेशीर काम…; अशाप्रकारे हा रिक्षा चालक लोकांच्या दुखातूनही कमाईचा नवा मार्ग शोधून काढला आहे,
आज आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत; ज्यांना घरातील समस्या, त्यांच्या रोजच्या जीवनातील अडचणी, दु:ख कोणाबरोबर तरी शेअर करायचे असते. पण, कित्येकदा तसे करणे त्यांना शक्य होत नाही. लोकांची हीच समस्या लक्षात घेत, रिक्षाचालकाने यातून पैसा कमावण्याची संधी शोधली आहे.
रिक्षाचालकाने आपल्या रिक्षाच्या मागे कामाची माहिती देण्यासाठी सर्व्हिस चार्जही लिहिला आहे. चालकाने लिहिलेय, “जर तुम्हाला कोणाशी बोलावंसं वाटतं, व्यक्त व्हावंसं वाटतंय तर इथे मी आहे. दुःखद गोष्टी ऐकून घेण्यासाठी- १०० रुपये, तुमच्या रोजच्या समस्या ऐकून घेण्यासाठी- ५०० रुपये, आणि तुमच्याबरोबर बसून रडण्यासाठी- २००० रुपये”. याचबरोबर रिक्षाचालकाने त्याचा इन्स्टाग्राम आयडीदेखील लिहिला आहे.
हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @SwathiSiara नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि हजारो लोकांनी लाईकही केला आहे.