सध्या व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ती म्हणजे नव्या फिचरची, आणि हे नवं फिचर म्हणजे WhatsApp Stickers. स्टिकर्सचं फिचर सर्व युजर्सच्या चांगलंच पसंतीस उतरतंय. पण अनेकांना अद्यापही या फिचरचा वापर करता येत नाही, कित्येकांना तर स्टिकर्सचा पर्यायच आलेला नाहीये. बरेच युजर्स अशे आहेत ज्यांनी स्टिकर्ससाठी तातडीने आपलं व्हॉट्स अॅप अपडेट केलं, कारण याचा वापर करण्यासाठी लेटेस्ट अपडेट असणं आवश्यक आहे. मात्र, अपडेट केल्यानंतरही स्टिकर्सचा पर्याय दिसत नसल्याने अनेकजण टेंशनमध्ये आहेत. पण चिंता करण्याची गरज नाही कारण खालील व्हिडीओद्वारे आम्ही स्टिकर्सचं फिचर तुमच्या व्हॉट्स अॅपमध्ये कसं मिळवायचं आणि त्याचा वापर कसा करायचा यावर एक सोपी ट्रिक सांगणार आहोत. पाहा व्हिडीओ –