यूपीएससी (UPSC) सारख्या परीक्षांची तयारी करणे म्हणजे एक कठीण बाब आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि तणावाची भावनाही निर्माण होते. अनेक अनुभवी आयएफएस अधिकारी यूट्यूब, इन्स्टाग्रामद्वारे परीक्षेची तयारी कशी करावी, सराव कसा करावा यावर काही उपाय नेहमीच सांगत असतात. पण, आज आयएफएस अधिकारी हिमांशू त्यागी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान मानसिक ताणतणाव कसा दूर करायचा याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.

परीक्षेच्या तयारीदरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मित्र-मैत्रिणींमधील गप्पा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. अनेक जण स्वतःला दोष देऊन इतरांबरोबर स्वतःची तुलना करतात, नशिबाला दोष देतात. तर हे लक्षात घेता आयएफएस अधिकारी हिमांशू त्यागी यांनी काही उपाय सुचविले आहेत, ज्याचा यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच तुमच्याही वैयक्तिक जीवनात याचा उपयोग होऊ शकतो. तर आयएफएस अधिकारी हिमांशू त्यागी यांनी सांगितलेल्या चार टिप्स पुढीलप्रमाणे –

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…भारतीय चिमुकल्याने पर्यटकाचे हरवलेलं घड्याळ केलं परत ; पोलिसांनी प्रमाणपत्र देऊन प्रामाणिकपणाचं केलं कौतुक

पोस्ट नक्की बघा…

१. भूतकाळ – आपण अनेकदा भूतकाळातील गोष्टींवर अवलंबून असतो. एखाद्या परिस्थितीला दोष देण्याऐवजी तुमच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा एकदा विचार करा व ते प्रसंग लिहून त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा.

२. परिस्थितीबद्दल असमाधानी राहणे – बऱ्याच वेळा आपण आपली नोकरी, आपली कामगिरी, स्वतःच्या राहणीमानाबद्दल असमाधानी असतो. तुम्ही असमाधानी का आहात, याचे कारण शोधा आणि त्यासाठी उपाय शोधून काढा.

३. इतरांशी तुलना करणे सोडा – तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना व कृतज्ञता व्यक्त करा. एक छोटासा ब्रेक घ्या आणि विचार करा की, तुमच्यासाठी नक्की कोणती गोष्ट महत्त्वाची आहे.

४. अरे ला कारे करू नका – जीवनात काही वाईट घटना घडते तेव्हा आपली चिडचिड होते, वादविवाद होतात; त्यामुळे आपला दृष्टिकोन विकृत आहे असं सिद्ध होतं. कधी कधी आपण रागात चुकीचे निर्णय घेतो. तर यावर उपाय म्हणून आपली चिडचिड का होते आहे, याकडे लक्ष द्या.

सोशल मीडियावर ही पोस्ट आयएफएस अधिकारी हिमांशू त्यागी यांच्या @Himanshutyg_ifs या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘यूपीएससीच्या तयारीदरम्यान आपण सर्व अनेक गोष्टींवरून स्वतःला कारणीभूत ठरवतो, (ट्रिगर होतो) आपण ट्रिगर का होतो? कारण जाणून घेतल्यास मदत होऊ शकते; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे व त्यांचा एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे.

Story img Loader