हरियाणातील नूह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ग्रामस्थांना बिबट्याची दोन पिल्ले सापडले. एका शेतकऱ्याने त्यांना घरी नेले आणि शेळीचे दूधही दिले. यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन शुक्रवारी दोन्ही पिल्लांची सुटका केली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. दरम्यान याबाबत भारतीय वन सेवा अधिकारी परवीन कासवान यांनी एक पोस्ट शेअर केली जिथे त्यांनी अशा परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये असा सल्ला दिला आहे. सापडलेल्या असहाय्य बिबट्याच्या पिल्लांना ज्याप्रकारे लोकांनी हाताळले आहे त्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुत्र्यांपासून वाचवून शेतकऱ्याने पिल्लांना नेले घरी

हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील कोटला गावाच्या डोंगरावर बांधलेल्या जुन्या किल्ल्याच्या अवशेषांमध्ये एका शेतकऱ्याला बिबट्याची दोन पिल्ले सापडली होती. गुरुवारी रात्री उशिरा गावातील एक शेतकऱ्याने आपली जनावरे डोंगरावरून घरी नेण्यासाठी आला होता. त्याच वेळी, डोंगरावर बांधलेल्या जुन्या उध्वस्त किल्ल्यात, त्याला दोन बिबट्याचे पिल्ले दिसली, त्यांच्याभोवती कुत्री भुंकत होते. जवळ आल्यावर त्याला बिबट्याचे पिल्लू ओळखता आले नाही. शेतकऱ्याने दोघांनाही वाचवण्याच्या उद्देशाने आपल्यासोबत घरी नेले. जिथे त्याला शेळीचे दूध पाजण्यात आले. ते मांजरीचे पिल्लू नसून बिबट्याचे पिल्लू असल्याचे नंतरच त्याच्या लक्षात आले.

गावात उडाली खळबळ, फोटो व्हिडीओ झाले व्हायरल

गावात बिबट्याचे पिल्लू आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मोठ्या संख्येने गावकरी आणि आजूबाजूचे लोक या पिल्लांना पाहण्यासाठी आले आणि त्यांनी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढण्यास सुरुवात केली. सकाळी वन्यजीव विभागाच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली.

बिबट्याच्या पिल्लांची आरोग्य तपासणी होणार आहे

या संदर्भात वन्यजीव विभागाचे निरीक्षक राजेश चहल सांगतात की, ”डोंगरात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांची प्रथम आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांची मादी बिबट्याशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पथकाने कारवाई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी लोकांना सावध केले की त्यांनी बिबट्याच्या पिल्लांना स्पर्श करू नये.”

या कारणामुळे IFS अधिकारी परवीन कासवान झाले नाराज

दरम्यान या सर्व प्रकाराबाबत IFS अधिकारी परवीन कासवान यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी बिबट्याच्या पिल्लांसह सेल्फी काढतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आणि लिहिले, “अशा काळात हे सर्व करण्याची गरज नसते. लोकांनी चुकूनही बिबट्यांच्या पिल्लांना असे उचलू नये आणि अशा वेळी सेल्फी काढण्याचा मोह बागळू नये. पिल्लांची आई नेहमी तिथे परत येते जिथे ती त्यांना सोडते. जर लोकांना मदत करायची असेल तर ते ठिकाण सुरक्षित ठेवू शकता.जर एकदा तुम्ही पिल्लांना उचलले तर त्यांची आईबरोबर भेट होणे, कठिण होते.अशा वेळी अनेकदा पिल्लांना जीव गमवावा लागतो किंवा किंवा अनेकदा त्यांना कैदी बनवले जाते. बचाव कार्यातून आलेल्या अनुभवाच्या जोरावर मी हे सांगत आहे

हेही वाचा – दिल्लीतील पुराच्या संकाटवर AI ने दिलं उत्तर! भविष्यात राजपथावर दिसतील अशा वॉटर बोटस्! पाहा फोटो

नेटकऱ्यांनी IFS अधिकारी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “हे वाचून माझे हृदय पिळवटले, लहान पिल्ले त्यांच्या आईबरोबर एकत्र येण्याची शक्यता नाही. म्हणजे ते जगू शकत नाही आणि हे लोक यासाठी जबाबदार आहेत.” असे एकाने लिहिले.

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! जेवणाच्या टेबलावर अचानक पडला मेलेला उंदीर; ग्राहकाचे ट्विट व्हायरल होताच IKEAने मागितली माफी

“मी बहुतेक वेळा ऐकले आहे की जेव्हा आई परत येते आणि पिल्लांना परक्यांनी स्पर्श केल्याचा वास येतो तेव्हा तिने त्यांना स्विकारण्यास नकार देते. आई अन्न शोधण्यासाठी गेली असावी आणि त्यांनी पिल्लांचे काय केले ते पहा, ” असे दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ifs officer parveen kaswan advised what are the dos and donts after farmer took home leopard cubs snk
Show comments