आएफएस अधिकारी (वन अधिकारी) प्रवीण कासवान अनेकदा वन्य जीवनाबद्दल नियमित वेगवेगळे अपडेट्स देत असतात. वन्य प्राणी, वन्य जीवन यांबद्दल अनोखी माहिती पोस्टच्या माध्यमातून ते नेटकऱ्यांना देत असतात. पण, भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
कल्पना चावला यांचे नाव ऐकले की, आपल्या सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो आणि त्यांच्या कार्याचे कौतुक वाटते. त्यांनी आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करीत आपले अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. तर देशातील कोट्यवधी मुलींसाठी प्रेरणास्थान असलेली पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला यांची काल जयंती होती. त्यानिमित्त वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी पोस्ट शेअर केली आहे.
पोस्ट नक्की बघा…
पोस्टमध्ये कल्पना चावला यांचे अंतराळवीर पोशाखातील चित्र खडूने रेखाटले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “१९७८ मध्ये पंजाब इंजिनियरिंग महाविद्यालयात एरोनॉटिकल इंजिनीयर अभ्यासक्रमात प्रवेश घेणारी पहिली तरुणी ठरली. ती फक्त एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये तिचा अभ्यास पुढे चालू ठेवला आणि एक अंतराळवीर म्हणून नासामध्ये सामील झाली. आज तिचे नाव भारतीय उपखंडातील सर्वांत प्रसिद्ध स्टार्समध्ये (Space star) घेतले जाते. कल्पना चावला आजही अनेकांची स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा आहे. कारण- तिने तरुणांना अंतराळात पोहोचण्यासाठी प्रेरित केले.” अशी ही त्यांनी लिहिलेली खास पोस्ट आहे.
१७ मार्च १९६२ रोजी कल्पना चावला यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेले. १९७६ साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. १९८२ साली पंजाब इंजिनियरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनियरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. तसेच कल्पना चावला यांनी केवळ अंतराळयात्री म्हणूनच यश मिळवले नाही, तर देशातील तमाम तरुण-तरुणींना स्वप्नांचा पाठलाग करण्याची शिकवण दिली. या उड्डाणपरीचा जीवनप्रवास वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी संपला. मी अंतराळासाठीच बनले हे त्यांचे शब्द तंतोतंत खरे ठरले.