आपल्यातल्या बऱ्याच लोकांची निरीक्षणातून वन्यजीवांशी ओळख झालेली असते. खिडकीच्या बाहेर किंवा गॅलरीत एक आगळावेगळा पक्षी दिसला की, मग आपण त्याच्याबद्दल समाजमाध्यमांवर माहिती शोधण्यास सुरुवात करतो. तसेच शहराबाहेर निसर्गरम्य ठिकाणी किंवा मग जंगलात वन्यजीवांच्या नवीन प्रजाती व त्यांची माहिती आपल्याला कळते आणि त्याचे फोटो काढून आपण मोबाईलमध्ये नमूद करून घेतो. तर आयएफएस अधिकारी परवीन कासवानसुद्धा त्यांच्या युजर्सना वन्यजीवांबद्दल नेहमी नवनवीन गोष्टी पोस्टद्वारे सांगत असतात. पण, आज त्यांनी एक हृदयस्पर्शी गोष्टी शेअर केली आहे; जे पाहून तुमच्याही डोळ्यांत नक्कीच अश्रू तरळतील.
आयएफएस अधिकारी परवीन कासवान नॅशनल पार्क सेंट्रल कॅम्पमध्ये गेले होते. यावेळी यांनी जंगलातील एका हत्ती कुटुंबाची गोष्ट सांगितली आहे. आईच्या मृत्यूनंतर हत्तीच्या बाळाला कसं वाचवलं हे सांगत त्यांनी त्या पिल्लाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच या हत्तीच्या पिल्लाला तात्पुरतं वेगळं ठेवून त्याला पशुवैद्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, असे परवीन कासवान म्हणत आहेत. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघा.
पोस्ट नक्की बघा…
परवीन कासवान यांनी हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेला हात लावत एक फोटो काढला. ‘हत्तीच्या पिल्लाची आई नुकतीच देवाघरी गेली. त्यामुळे कालच येथे तिला स्थलांतरित करण्यात आलं आहे. तर तिला तात्पुरत्या क्वारंटाईनमध्ये आणि पशुवैद्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. आशा आहे की, भावी आयुष्यात आमच्या नॅशनल पार्क सेंट्रल कॅम्पमध्ये हे लहान पिल्लू चांगली कामगिरी करील’, अशी कॅप्शन त्यांनी या फोटोच्या पोस्टला दिली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट परवीन कासवान यांच्या अधिकृत @ParveenKaswan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. अशा हृदयस्पर्शी कथा परवीन कासवान नेहमीच शेअर करीत असतात. याआधी मार्चमध्ये त्यांनी गजराज नावाच्या अनाथ हत्तीबद्दल पोस्ट केली होती; ज्याने आईच्या मृत्यूनंतर नवीन आयुष्याची सुरुवात केली. या कथा परवीन कासवान यांचे वन्यजीव संवर्धनासाठीचे समर्पण आणि त्यांच्या टीमचे अथक प्रयत्न अधोरेखित करतात. त्यांच्या सोशल मीडियावर तुम्ही एक नजर टाकलीत, तर तेथे अनेक प्रेरणादायी कथा, वन्यजीवांचे संरक्षण आणि त्याची काळजी घेण्यासाठी केले जाणारे महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या पोस्ट दिसतात.