Rare Animal Found In The Forest : जंगलात वेगवेगळ्या जातींचे प्राणी असतात. अनेकदा असे प्राणीही दिसतात ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीच नसतं. वाघ, चित्ता, सिंहाशिवाय जंगली मांजरांच्याही अनेक प्रजाती असतात. सोशल मीडियावर नेहमी या प्राण्यांचे फोटो पाहायला मिळतात आणि आपल्याला माहित नसतं, की हे प्राणी कोणते आहेत. परंतु, काही दिवसांपासून भारतीय वन विभागातील अधिकारी अशा प्राण्यांबद्दल लोकांना माहिती देत असतात. ते नेहमी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या दुर्मिळ प्राण्यांचे फोटो शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा आएफएस अधिकाऱ्याने ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे. पण या प्राण्याचं नाव सांगण्याऱ्या व्यक्तीला बक्षिसही जाहीर केलं आहे.
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, भारतात आढळणाऱ्या सर्वात सुंदर जंगली मांजरांच्या प्रजातींपैकी एक. खूप कमी वेळा महित होतं आणि खूप कमी वेळा हा प्राणी दिसतो. चेहऱ्यावर पांढऱ्या निशाणावरून सहजपणे ओळखू शकता. पहिल्यांदा उत्तर बरोबर सांगणाऱ्याला माझ्याकडून पुस्तक दिलं जाईल.
या फोटोत चित्तासारखे दिसणारे दोन प्राणी दिसत आहेत. या पोस्टला आतापर्यंत २ लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आलं आहे. तर दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. पण सर्वात जास्त लोकांनी या प्राण्याला एशियन गोल्डन कॅट म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं, हे कळल्यानंतर आनंद झाला की हा प्राणी अजूनही भारतात आहे. हा फोटो कुठे काढण्यात आला आहे? दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, मी या प्राण्याबद्दल ऐकलं आहे. पण दुर्देवाने याला जंगलात कधी पाहिलं नाही. हा प्राणी खूप उंचावर जातो. हा फोटो मानस राष्ट्रीय उद्यानात घेतल्यासारखा वाटतो. बंगालमध्ये याला कॅटोपुमा टेम्मिंकी नावाने ओळखलं जातं.