IFS ऑफिसर परवीन कासवान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात आणि अनेकदा अशा पोस्ट शेअर करत असतात, ज्यातून अशी माहिती मिळते जी बहुतेक लोकांना माहित नसते. अनेकदा त्याच्या ट्विट आणि पोस्टद्वारे जंगल आणि प्राण्यांशी संबंधित मनोरंजक गोष्टी सांगत असतात. दरम्यान नुकताच त्यांनी त्यांच्या X अकाउंटवर जंगलातील आगीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, जंगलातील आग शमविणे हे जगातील सर्वात कठीण काम आहे. आणि असे का होते याची कारणेही त्यांनी दिली आहेत.

साधारण दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये जंगलातील अग्नीतांडव दिसत आहे. रात्रीच्या वेळी जंगलात आग लागली असून आगीच्या ज्वाळांनी वेढलेले दिसत आहे. आगीच्या ठिणग्या सर्वत्र उडत आहेत. व्हिडिओमध्ये आग दूरवर पसरल्याचे दिसते. पण काही काही वनकर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून फायर ब्लोअर मशीन पाठीवर अडकवून आग शमविण्याच प्रयत्न करत आहे.

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच

व्हिडीओ शेअर करताना परवीन कासवान यांनी खास कॅप्शन दिले आहे ज्यामध्ये त्यांनी जंगलामध्ये आग लागण्यानंतर ज्या आव्हानाचा सामना करावा लागतो त्याबद्दल सांगितले. त्यांनी लिहिले की, जंगलातील आग शमविणे हे सर्वात कठिण कामांपैकी एक आहे. जंगलामध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या जाऊ शकत नाही. हवेमध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीने आग लागण्याची शक्यता असते. येथे वनकर्मचऱ्यांची टीम आग शमविण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा – दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

आगीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ माजवत असून व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. ही आग नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे वर्णन करताना, एका वापरकर्त्याने म्हटले, ‘जंगलातील आग ही स्वतःला संतुलित ठेवण्याचा निसर्गाचा मार्ग नाही का? यात मानवी हस्तक्षेपाची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?’ दुसऱ्याने कुतूहल व्यक्त करत विचारले, ‘तुम्ही ते हवेचे टँकर वापरत नाही का, जे वरच्या दिशेने उडून आगीवर पाणी ओततात?’ दुसऱ्याने कुतूहल व्यक्त करत विचारले, ‘तुम्ही ते हवेचे टँकर वापरत नाही का, जे वरच्या दिशेने उडतात आणि आगीवर पाणी ओततात?’

हेही वाचा – दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

तिसऱ्याने फायर ब्लोअर मशीनबद्दल प्रश्न विचारला, ‘वाऱ्यामुळे आग आणखी वाढणार नाही का?’ याला उत्तर देताना IFS अधिकारी म्हणाले, ‘होय, जेव्हा वारा वाढत्या दिशेने वाहतो तेव्हा परिस्थिती बिकट होते, पण जेव्हा आपण ब्लोअरने विरुद्ध दिशेने वारा वाहतो तेव्हा आग शमवली जाते.’