IFS officer shares adorable pic with orphan baby elephant : सोशल मीडियावर प्राण्यांचे फोटो व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात त्यापैकी काही असे असतात जे पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येतात. काही दिवसांपूर्वीच एका मातीत खेळणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता एका अनाथ हत्तीच्या पिल्लाचा गोंडस फोटो नेटकऱ्याच्या मनाला भावला आहे.
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हत्तीच्या पिल्लाची सुटका केल्यानंतर त्याच्याबरोबरील एक सुंदर फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. वन्यजीव संवर्धनाबद्दल हृदयस्पर्शी पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृदयस्पर्शी फोटोमध्ये कासवान आणि एक हत्तीची पिल्लू यांच्यातील एक गोड क्षण दिसतो आहे. संकाटामध्ये एक आशा देणारी आणि काळजी व्यक्त करणारा हा फोटो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.
फोटोमध्ये पाहू शकता की, एका हत्तीच्या पिल्लाला कासवान केळी खायला देत आहे. त्यांनी एका हातात हत्तीची सोंड पकडली आहे आणि दुसऱ्या हातात केळी. हत्तीच्या कपाळावर सुंदर फुलाचे चित्र काढले आहे ज्यामुळे ते पिल्लू फारच गोंडस दिसत आहे. बाजूला आणखी दोन हत्ती आहे ज्यांच्याजवळ एक व्यक्ती उभा आहे.
हेही वाचा – “माझी आवडती व्यक्ती…..” लेकीचा निबंध वाचून आई झाली चकित; तुम्हालाही येईल हसू
हेही वाचा – Fact check: खड्ड्यांमधून उसळणाऱ्या गाड्यांचा व्हिडिओ लखनऊचा नव्हे, व्हायरल दावा खोटा
फोटो शेअर करताना कासवान यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “गजराजने त्याची आई गमावली आणि नंतर आमच्या टीमने त्याची सुटका केली. आमच्या शिबिरात आता चांगले काम करत आहे,” ही पोस्ट अनाथ हत्तीच्या पिल्लाच्या बचावाची गोष्ट तर सांगतेच पण असुरक्षित प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी वन्यजीव संरक्षकांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकते.
ही पोस्टला ८२ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. अनेकांनी फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हत्तीच्या पिल्ला पाहून लोकांना आनंद झाला आहे आणि त्यांनी कासवानच्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले.
हेही वाचा – हवेत उडताना दिसली गाय? पाहा व्हायरल व्हिडीओ, जाणून घ्या काय आहे सत्य…
हत्तीच्या बचाव आणि पुनर्वसनाची गोष्ट वन्यजीवांच्या लवचिकतेचा आणि त्यांच्या संरक्षणासाठी समर्पित असलेल्यांच्या करुणेचा पुरावा देत आहे. , IFS अधिकारी परवीन कासवान यांचे एक्स प्रोफाइलवर अशा अनेक हृदयस्पर्शीआणि प्रेरणादायी संवर्धन प्रयत्नाच्या गोष्टी पाहायला मिळतील.