IFS Officer Shares Tiger Photo : आपल्यातील अनेक जण जंगलातील प्राणी पाहण्यासाठी जंगल सफारी, नॅशनल पार्कमध्ये जातात. कारण सिंह, वाघ या प्राण्यांना बघण्यात आपल्याला एक वेगळाच आनंद असतो. पण, वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. त्याच्या नुसत्या एण्ट्रीनं सुद्धा अख्खं जंगल थरथर कापू लागते, वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या लोकांना घाम फुटतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक फोटो (photo) व्हायरल होतो आहे, यामध्ये जणू काही जंगलाचे संरक्षण करताना वाघ दिसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांच्या एका पोस्टने ट्विटर (एक्स) वर तुफान चर्चा केली आहे. एक्स (ट्विटर) वर ॲक्टिव्ह असणारे आयएफएस ऑफिसर नंदा यांनी, जंगलातील एक अविस्मरणीय फोटो शेअर केला आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शांतपणे एक वाघ बसलेला दिसतो आहे. जंगलात वसलेल्या अँटी पोचिंग कॅम्प म्हणजेच शिबिराच्या (anti poaching camp) गेटवर हा फोटो (Photo) शेअर करण्यात आला आहे. पण, हा फोटो शेअर करताना त्यांनी लोकांची हलकीशी फिरकी घेत. त्यांनी कॅप्शनमध्ये नक्की वाघाला काय म्हंटले आहे पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा…

पोस्ट नक्की बघा…

आयएफएस ऑफिसर नंदा यांनी जंगलातील या वाघाला ‘ओरिजिनल गार्ड’ (original guard) म्हणून संबोधले आहे. तसेच तुम्ही फोटो अगदी जवळून पाहिलात, तर तुम्हाला तिथे एक नाही तर दोन वाघ दिसतील. इमारतीसमोरील झाडांखाली बसलेला दुसरा वाघ तुम्हाला दिसेल, ज्यामुळे फोटो आणखी आणखीन आकर्षिक दिसू लागला. अशाप्रकारे, युजर्सनी पोस्ट पाहिल्यावर ‘गार्ड्स ऑफ द फॉरेस्ट’ (Guards of the forest) असे नाव आयएफएस अधिकारी नंदा याना सुचवले.

तक्रार करायला आला असेल…

सोशल मीडियावर ही पोस्ट (Photo) आयएफएस ऑफिसर नंदा यांच्या अधिकृत @susantananda3 एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘अँटी पोचिंग कॅम्पचे फॉरेस्ट गार्ड (वनरक्षक); अशी कॅप्शन फोटोला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी फोटो पाहून विविध शब्दात या फोटोचे वर्णन करताना दिसत आहेत. ‘तक्रार करायला आला असेल, अद्भुत, अलौकिक, शिबिराची पाहणी करण्यासाठी आले आहेत बहुतेक ; आदी वेगवेगळ्या कमेंट केलेल्या दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ifs officer shares photo of tiger calmly seated at the entrance of an office gate of an anti poaching camp asp