Viral Most Trafficked Mammal On Planet: सोशल मीडियावर विचित्र व्हिडीओ तर दरदिवशी व्हायरल होत असतात. पण आता खरोखरच आपल्या ज्ञानात भर पाडणारे एक ट्वीट प्रचंड चर्चेत आहे. भारतीय वन्याधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर एका दुर्मिळ प्राण्याचा फोटो शेअर करून नेटकऱ्यांना एक प्रश्न केला आहे. ट्वीटनुसार हा जगातील सर्वाधिक तस्कारी होणाऱ्या प्राण्यांमधील दुसऱ्या क्रमांकाचा प्राणी आहे. या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, अखेरीस कासवान यांनी स्वतः उत्तर देत हा प्राणी पँगोलीन असून याची तस्करी का केली जाते याचे उत्तर दिले आहे.

पँगोलीन या प्राण्याचे मराठी नाव खवल्या मांजर असे आहे. अलीकडेच या खवल्या मांजराची तस्करी होताना कासवान यांच्या टीमने त्याचा बचाव केला होता व तेव्हाच हा फोटो काढण्यात आला.

आपल्याकडे भारतीय आणि चिनी पॅंगोलिन पाहायला मिळतात. खवले मांजरांच्या खवल्यांच्या पावडरीचा वापर औषधासाठी केला जातो त्यामुळे या खवल्यांना प्रचंड मागणी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. चीनमध्ये याचा वापर सर्वाधिक केला जात असल्याचे समजते. एका खवले मांजराच्या खवल्यांना लाखो रुपये मिळत असल्याचे सांगतात. हा सर्वच व्यापार बेकायदेशीर असल्याने त्याची खरी आकडेवारी कळत नाही. २०१७ मध्ये ‘ट्रॅफिक’ने प्रकाशित केलेल्या अहवालात प्रौढ खवले मांजराच्या खवल्यांचे वजन एक किलो असते असा उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एका किलोला लाख रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते.

हे ही वाचा<< Video: टॉमी झाला नवरा, जेली नवरीबाई.. माणसांपेक्षा थाटात लागलं लग्न; वरातीत पाहुण्या कुत्र्यांची भन्नाट पार्टी

दरम्यान, आतापर्यंत या ट्वीटला १८ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि जवळपास ९७० लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट शेअर केली आहे.जगभरात शिकारीद्वारे पॅंगोलिनची तस्करी केली जाते. या अवैध व्यापारामुळे हे खवले मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक वन्यजीव निधीनुसार, पॅंगोलिनच्या 8 प्रजाती आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार संरक्षित आहेत. त्यापैकी दोन IUCN धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीमध्ये सुचीबद्ध केल्या आहेत.

Story img Loader