तुम्हाला लाखो रूपयांची लॉटरी लागली आहे, तुम्हाला ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत हे बक्षीस मिळाले आहे! लगेच क्लेम करा असे असंख्य मेसेज आजपर्यंत तुम्हाला आले असतील. या बक्षीसांचा मोह झालेले अनेक जण ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना देखील अनेक आहेत. लोकांना बक्षीसांचे आमिष दाखवून त्यांचा डेटा चोरी करण्यात, त्यांच्या फोनमधील पैशांच्या व्यवहारासाठी वापरले जाणारे ॲप्स हॅक करण्यात हे फ्रॉड करणारी मंडळी पटाईत असतात. असाच एक फ्रॉड मेसेज सगळ्यांना फॉरवर्ड करण्यात येत आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, हा फोटो एका मेसेजचा असल्याचे दिसत आहे. या मेसेजमध्ये ‘तुमचा रेज्युमे सिलेक्ट करण्यात आला आहे आणि पगार ९,७०० रुपये असेल.’ असा आशय लिहला आहे आणि कॉन्टॅक्टसाठी एक लिंक देण्यात आली आहे. हा स्कॅम असल्याचे परवीन कासवान यांनी सांगितले आहे.
परवीन कासवान यांचे ट्वीट :
परवीन कासवान यांनी या ट्वीटमधून ऑनलाईन फ्रॉडपासून सावध केले आहे. ‘अशाप्रकारच्या कोणत्याही मेसेजची दखल घेऊ नका आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. हा ऑनलाईन फ्रॉडचा प्रकार आहे. यामुळे तुमचा डेटा चोरी होण्याबरोबर तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता.’ असे ट्वीटमध्ये सांगितले आहे. यावर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहा.
आणखी वाचा : आजीच्या मृत्यूबद्दलच्या Linkedin पोस्टमुळे बड्या कंपनीचा CEO ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
हा मेसेज अनेक जणांना फॉरवर्ड करण्यात आल्याचे कमेंट्सवरून समजते. याविरोधात लवकरच ॲक्शन घेण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.