IFS Officer Shares Video Of A Rhino Giving Birth: भारतीय वनसेवा अधिकारी सुधा रमन यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो याआधी तुम्ही क्वचितच पाहिला असेल. तुम्ही अनेकदा गाय, म्हैस, बकरी इत्यादी प्राण्यांची मुले जन्माला आल्याचे पाहिले असेल, पण गेंड्याच्या पिल्लाचा जन्म होताना तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल. जो अतिशय हृदयस्पर्शी आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी शेअर केला आहे. वाइल्डफ्रेंड्स आफ्रिका या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता.
गेंड्याच्या पिल्लाच्या जन्माचा Video व्हायरल
गेंड्याच्या पिल्लाचा जन्म होतानाचा व्हिडिओचे अविश्वसनीय क्षण एका छायाचित्रकाराने टिपले आहेत आणि तो ऑनलाइन शेअर केला. वन अधिकाऱ्याने ट्विटरवर लिहिले की, गेंडा आपल्या बाळाला जन्म देताना पाहणे दुर्मिळ आहे. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “असे मौल्यवान क्षण पाहणे दुर्मिळ आहे. एक नवीन जीवन, एक मादी गेंडा १६ ते १८ महिन्यांच्या गर्भधारणेनंतर आई बनली.
( हे ही वाचा: लग्नात बेभान नाचत होतं ‘हे’ जोडपं; पण व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांनी काही वेगळंच पाहिलं)
गेंड्याच्या पिल्लाचा जन्म होतानाचा दुर्मिळ क्षण
या दुर्मिळ दृश्याने इंटरनेटवर लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘अशी अविश्वसनीय दृश्ये पाहणे खरोखरच दुर्मिळ आहे. तर दुसर्या युजरने लिहिले आहे की, “खरंच एक सुंदर क्षण. मला आशा आहे की आई आणि वासरू दीर्घ आणि शांत आयुष्य जगतील.”