IFS Officer Susanta Nanda Shared Lioness And Cub Beautiful Video : आई आणि मुलांचं नातं जगातील सर्वात प्रेमळ आणि मजबूत नातं असतं. आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकते. एक आईच असते, जी आपल्या लेकरांसाठी नेहमीच काबाडकष्ट करत असते. आई आपल्या मुलांना कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही आणि जीवनात नेहमी योग्य आणि सत्य गोष्टींचं शिक्षण देत असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की, जी माणसं आईने सांगितलेल्या गोष्टींचं पालन करतात, ते कधीच चुकीच्या मार्गावर जात नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून नक्कीच म्हणता येईल, आई आपल्या मुलांना कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक सिंहिण तिच्या बछड्यांना सोबत घेत पाण्याच्या प्रवाहातून रस्ता ओलांडत असते. सिंहिणीचे सर्व बछडे तिच्यासोबत चालत असतात आणि एक रांगेत राहून सिहिंणीसोबत ते बछडे रस्ता पार करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्राण्यांचे पिल्लंही त्यांच्या आईचं ऐकतात आणि नेहमी मातेसोबत प्रामाणिक राहतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच असं म्हणता येईल.

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
Aai kuthe kay karte fame Rupali Bhosale bought a new mercedes benz
Video: “वेलकम बेबी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात फक्त…”
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल

नक्की वाचा – Optical Illusion: या चित्रात कोणता प्राणी दिसतोय? बैल की हत्ती? क्लिक करुन नीट बघा

इथे पाहा सिंहिणीच्या बछड्यांचा जबरदस्त व्हिडीओ

हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. ३० सेकंदाचा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, तुम्ही आईचं ऐकत जा, कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. या व्हिडीओला आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सने सुंदर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं, आईला गमावल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली. दुसरा यूजर म्हणाला, मी या व्हिडीओचं समर्थन करतो. हा व्हिडीओ इंटरनेटवर हजारो नेटकऱ्यांनी मनं जिंकत आहे. कारण मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आई काय करू शकते, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. आई प्रत्येक क्षणाला तिच्या लेकरांची काळजी घेत असते, असंच या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Story img Loader