Wild Animals Shocking Video Viral : जंगलात अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी संचार करत असतात. पण काही प्राणी जंगलाचा राजा असल्यासारखे वागतात आणि इतर प्राण्यांशी दोन हात करतात. वाघ, सिंहासारखे खतरनाक प्राणी छोट्या प्राण्यांची शिकार करून त्यांचा फडशा पाडतात. पण कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते आणि या प्राण्यांच्या नाकी नऊ येतं. सिंह हा जंगलाचा राजा आहे. पण काही प्राण्यांना ते मान्य नसतं. कारण जंगलात भटकणारे काही प्राणी सिंहाच्या नादी लागतात आणि आम्हीच जंगलाचे राजे आहोत, असा मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे गेंड्याने सिंहाशी पंगा घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जंगलाचा खरा राज कोण? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, जंगलातील वाटेवर दोन खतरनाक सिंह विश्रांती घेत असतात. त्याचदरम्यानत दोन गेंडा जातीचे प्राणी सिंहाच्या जवळ येतात आणि रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करतात. गेंड्याला असं वाटतं की, तेच या जंगलातील राजा आहेत. कारण दोन्ही सिंह रस्त्यावर बसलेले असताना त्यांची दिशा बदलतात. प्राण्यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सिंह गेंड्याला घाबरतात, असं मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की, प्राण्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांवर हल्ला करण्याऐवजी जंगलात शांतता राखण्याचं काम केलं पाहिजे.

नक्की वाचा – तू ‘पागल’ है.. ट्रेनमध्येच महिलेचा पारा चढला अन् जोडप्याला केली धक्काबुक्की, Video झाला व्हायरल

इथे पाहा सिंहाचा आणि गेंड्याचा खतरनाक व्हिडीओ

सिंहाचा आणि गेंड्यांचा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, वाघ नव्हे आणि सिंह सुद्धा जंगलातील राजा नाहीत. परिस्थितीवर सर्वकाही अवलंबून असतं. या व्हिडीओला १८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर शेकडोंच्या संख्येत प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे. सुसंता नंदा हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी वाघ आणि अस्वलाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओही इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता.