आयआयटी म्हटलं की सर्वसाधारणपणे जाड चष्मा लावून असलेली अभ्यासू मुलं समोर येतात. दिवसाच्या २४ पैकी २६ तास अभ्यास करणं हेच या मुलांचं जीवन अशी समजूत आपल्या सगळ्यांची असते किंवा ‘आयआयटीमध्ये जायचंय हं’ या विचाराने गाड्याला जुंपल्या गेलेल्या हजारो मुलांच्या पालकांनी त्यांची अशी समजूत करून दिलेली असते. पण अभ्यासासोबत विरंगुळाही हवा. आपल्या कलात्मकतेला, आपल्यातल्या इतर गुणांना वावही मिळायला हवा. असं चौफेर आयुष्य जगत स्वत:ची चारही अंगांनी प्रगती करणारे विद्यार्थीच या परीक्षा ‘क्रॅक’ करू शकतात. आणि हा कोर्स पूर्ण करत चांगलं आयुष्य जगू शकतात.
या सगळ्याचीच प्रचीती देणारा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. आयआयटी रूरकीमधल्या विद्यार्थ्यांनी एक म्युझिक व्हिडिओ तयार केलाय आणि हा खरोखर मस्त झाला आहे. पहा हा व्हिडिओ:
सौजन्य: यूट्यूब
हा व्हिडिओ खरंच छान झालाय. मग त्यात लिप सिंकिग असेल, डान्सिंग असेल, काॅस्चुम सिलेक्शन असेल किंवा एडिटिंग असेल. या सगळ्यामध्ये या विद्यार्थ्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. हे सगळे आयआयटी रूरकीचे विद्यार्थी आहेत.
पूर्वीप्रमाणे व्हिडिओ मेकिंग किंवा अगदी म्युझिक व्हिडिओ मेकिंग ही काही थोड्या जणांची मक्तेदारी राहिलेली नाही. आजकाल उपलब्ध होणाऱ्या अनेक अॅप्समुळे आणि कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे तसंच स्मार्टफोन कॅमेऱ्यांनीही आपण असे अनेक व्हिडिओज् बनवू शकतो. अर्थात असे व्हिडिओ बनवत असतानाही कौशल्य लागतं. एडिटिंगमध्ये सफाई लागते तसंच काम करणाऱ्या कलाकारांचा परफाॅर्मन्सही ताकदीचा असावा लागतो. आयआयटीमधल्या अभ्यासू किड्यांमध्ये ही सगळी स्किल्स असल्याचं लक्षात येतंय.
वाचा- ‘इस्रो’मध्ये नोकरीची संधी: दरमहा 56,000 रूपयांपर्यंत पगार!
बाय द वे, हे गाणं तुम्हाला आवडलं असेल आणि हे मूळचं गाणं कुठलं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खालचा व्हिडिओ पहा
सौजन्य: यूट्यूब
एड शिरान या गायकाचं हे गाणं आहे. काहीशा संथ गाण्यांसाठी हा गायक प्रसिध्द आहे. एड शिरानच्या गाण्यांचे शब्दही अतिशय सुंदर असतात. तुम्ही ‘द हाॅबिट’ या इंग्लिश सिनेमाचा दुसरा भाग पाहिला आहे का? हा सिनेमा संपल्यावर जे एक नितांतसुंदर गाणं वाजतं ते एड शिरानचंच आहे. पहा…
सौजन्य: यूट्यूब
या गायकाच्या ‘शेप आॅफ यू’ गाण्याला आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी मस्त न्याय दिलाय हेच म्हणावं लागेल.