नोटांबंदीच्या निर्णयाला आता तीन आठवडे उलटले आहेत. या निर्णयानंतर जुन्या नोटा चलनातून बाद होऊन पाचशे आणि दोन हजारांची नवी नोट चलनात आली आहे. पण या नोटेमुळे देखील नागरिकांना रोज नवनव्या समस्यांना सामोर जावे लागत आहे. आधीच सुट्या पैशांचा तुटवडा असल्याने कोणीही दोन हजारांचे सुटे द्यायला मागत नाही, त्यामुळे २ हजारांची नोट नक्की का काढली असा प्रश्न हैराण नागरिक विचारत आहेत. अशातच गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर हजार रुपयाच्या नोटेचा फोटो व्हायरल झाला आहे. आता ही नोट खरी की खोटी असा संभ्रम सगळ्यांना पडला आहे.
निळ्या रंगातील या १ हजार रुपयांच्या नोटेचा फोटो व्हॉट्स अॅप, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर फिरत आहे. लवकरच १ हजारांची अशी नोट चलनात येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. पण, अद्यापही ही नोट खरी की खोटी याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी ही खोटी नोट असून यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे. तर काहिशी नव्या ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटेच्या जवळपास जाणारी ही नोट असल्याने ती नोट खरी आहे असेही काहींचे म्हणणे आहे. नोटाबंदीच्या निर्णयाआधी देखील २ हजार रुपयांच्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे, कदाचित नव्या १ हजार रुपयांच्या नोटेबाबत देखील असेच झाले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही नोट खरी की खोटी असा संभ्रम सगळ्यांना पडला आहे. पण, अधिकृतरित्या अशा प्रकारची १ हजार रुपायांची नवी नोट येणार असल्याची कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही.
https://twitter.com/OYERJALOK/status/804307486517981184
२ हजारांची नोट चलनात येण्यापूर्वी अशाच काही चर्चा होत्या. या नोटांमध्ये जीपीएस बसवले असून त्या लपवण्याचा प्रयत्न केल्यास त्या ट्रक होतील अशा अनेक अफवांना सोशल मीडियावर पेव फुटले होते. त्यांमुळे ही नोट खरी की खोटी असा संभ्रम अनेकांना पडला आहे. एका रेडिओ जॉकीने देखील या नोटेचा फोटो ट्विटरवर टाकत मोदींना ही नोट खरी की खोटी याबद्दल प्रश्न विचारला होता.