तंत्रज्ञान दिवसेंदिवस अपडेट होत असताना मोबाईलचा IMEI क्रमांक बदलण्याचा प्रयत्न झाल्यास त्या व्यक्तीला ३ वर्षांचा कारावास होण्याची शक्यता आहे. याशिवाय संबंधित व्यक्तीला दंडही भरावा लागू शकतो. मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. प्रत्येक मोबाइलसाठी दिला जाणारा त्याचा १५ आकडी ओळख क्रमांक, अर्थात इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेन्टिटी (आयएमईआय) क्रमांक ही त्या प्रत्येक हँडसेटची ओळख असते.
प्रत्येक मोबाईलचा IMEI क्रमांक वेगळा असून, तो बदलण्याचा किंवा चोरण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गुन्हा म्हणून नोंद होणार आहे. दूरसंचार विभागाने २५ ऑगस्ट रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ‘नोकरी’चा सेल

या निर्णयामुळे खोटे IMEI नंबर आणि हरवलेले फोन पुन्हा शोधण्यात मदत होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सरकारने यासाठी ‘दी प्रिव्हेन्शन ऑफ टॅम्परिंग ऑफ द मोबाइल डिव्हाइस इक्विपमेंट आयडेन्टिपिकेशन नंबर रुल्स, २०१७’ हा नवा नियम तयार केला आहे. या नियमानुसार हा क्रमांक बदलणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानी क्रिकेट चाहते म्हणतात शहजाद नाही कोहलीच आमचा फेव्हरेट!

मोबाइल वापरणाऱ्यांकडून कॉल केल्यानंतर तो कॉल संबंधित सेवा पुरवठादार कंपनीकडे नोंदवला जातो. या नोंदणीत मोबाइलचा आयएमईआय क्रमांक दिसतो. मोबाईल ग्राहक आपले सिमकार्ड बदलून नवीन घेऊ शकतो. मात्र IMEI क्रमांक बदलण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे तांत्रिक ज्ञान आणि विशेष तंत्रज्ञान असणे गरजेचे असते. हा IMEI क्रमांक मोबाईलच्या प्रत्येक मॉडेलला जागतिक स्तरावरील संस्थेकडून देण्यात येतो. मोबाइल हरवल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी ग्राहकाला IMEI क्रमांक देणे आवश्यक असते.

Story img Loader