लहान मुलांना सांभाळणे सोपी गोष्ट नसते. नजर हटेपर्यंत मुलं काय गोंधळ घालतील याचा नेम नाही. पालकांना डोळ्यात तेल घालून मुलांवर लक्ष ठेवावे लागते. पालकांचा जरा दुर्लक्षपणामुळे अनेकदा मुलं स्वत:चा जीव धोक्यात टाकतात आणि दोष मात्र पालकांनाचा दिला जातो.

काही दिवसांपूर्वी एक लहान बाळ बाल्कनीतून पत्र्यावर पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुदैवाने लेकराचा जीव वाचला. दरम्यान अशाच एका घटनेचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये लटकणाऱ्या चिमुकल्याला एका तरुणाने ब्लिडिंगवर चढून वाचवले आहे. स्पायडर मॅन सारखे इमारतीवर चढून चिमुकल्याला वाचवणाऱ्या व्यक्तीचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
Passenger's leg gets stuck in the door driver did not stop the bus
“माणूसकी मेली!”, दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय, चालकाने थांबवली नाही बस, धक्कादायक घटनेचा Video Viral
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
life threatening stunt
‘मृत्यूचा पाठलाग करू नको, मृत्यू तुझा पाठलाग करेल’, रीलसाठी तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Dombivali Viral Video Dombivli Child Falls From Building 3rd Floor bhavesh mhatre explain incidence video viral
VIDEO…खरंच देवासारखा धावलास! २ वर्षाचं लेकरु तिसऱ्या माळ्यावरुन पडलं अन् एकट्याच्या चपळाईनं कुटुंब वाचलं; नेमकं काय घडलं त्यानंच सांगितलं
Bihar Class 10 Girl Accident
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून लहान मुलगा लटकलेला दिसत होता. जवळच्या बाल्कनीत उभा असलेला एक व्यक्ती मदत करू शकत नव्हता. संभ्याव्य दुर्घटना टाळण्यासाठी एका तरुणाने मोठे धाडस दाखवले. अगदी चपळपणे त्या मुलाला वाचवण्यासाठी हा तरुण बिल्डिंगवर चढला. सरसर चढत तो चौथ्या मजल्यावरील मुलापर्यंत जाऊन पोहचला आणि त्याला उचलून बाल्कनीच्या आत सोडले. ही घटना २०१८ मध्ये पॅरीसमध्ये घडली. ज्यानंतर या तरुणाला सर्वजण स्पायडर-मॅन म्हणू लागले.

हेही वाचवा – Video : नेपाळमध्ये भूस्खलन! त्रिशूली नदीत वाहून गेल्या दोन बस, ७ भारतीयांसह ६५ जण बेपत्ता

इंस्टाग्रामवर sachkadwahai नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला पुन्हा पोस्ट केला आहे.” २०१८ रोजी, माली येथील स्थलांतरित असलेल्या मामुदौ गासामाने बाल्कनीतून लटकत असलेल्या चार वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी पॅरिसमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये प्रवेश केला. मुलाला वाचवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्याची भेट घेतली. त्यानंतर त्याला फ्रेंच नागरिकत्व आणि पॅरिस अग्निशमन दलात नोकरी देण्यात आली आणि फ्रँकमध्ये कायदेशीररित्या राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळाली” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडीओवर कमेंट करून नेटकऱ्यांनी या व्यक्तीचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले, “खरंच धाडसी आहे हा मनुष्य” दुसऱ्याने लिहिले की, चिमुकल्याने खरोखर ताकद वापरून पकडले होते”

हेही वाचा –पुणेकरांनी हद्दच केली राव! “गुपचूप बस तिथं” म्हणत थेट बिबट्यालाच दरडावले, महावितरण कार्यालयातील Video Viral

मामुदौ गास्सामा (२२) या नावाने ओळखला जाणारा हा माणूस वायव्य आफ्रिकेतील संकटग्रस्त माजी फ्रेंच वसाहत असलेल्या माली येथील स्थलांतरित आहे, त्याने कागदपत्रांशिवाय बुर्किना फासो, नायजर आणि लिबियामधून इटलीला धोकादायक भूमध्य समुद्र ओलांडून सप्टेंबरमध्ये फ्रान्समध्ये पोहोचण्यापूर्वी प्रवास केला. चिमुकल्याला वाचवल्यांतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्याचीभेट घेतली. आता, त्याला फ्रान्समध्ये कायदेशीररित्या राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळतील.

Story img Loader