Accident viral video: पावसाळा सर्वांनाच आवडीचा असला तरी वाहनचालकांसाठी त्रासदायक असतो. पावसात गाडी चालवताना खूप सतर्क रहावं लागतं. रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता, एका बाईकवर एक महिला आणि लहान मुलं आहे, बाईकस्वार गाडी चालवत आहे. पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलं आहे. त्यामुळे खड्ड्यांचाही अंदाज येत नाहीय. मात्र याच खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा तोल जातो आणि तो बाजुने जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली येतो. यावेळी त्याच्या डोक्यावरुन ट्रॅक्टरचं चाक जातं, मात्र हेल्मेट असल्यामुळे त्याला काही दुखापत होत नाही. यावेळी एका हेल्मेटनं मृत्यू रोखला असं आपण म्हणू शकतो. हेल्मेटमुळे हा व्यक्ती थोडक्यात बचावला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral Video: नसतं धाडस कशाला? समुद्रातील बोट राईड जीवावर बेतली! बोटीसह पर्यटकही बुडाले

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं, की ‘लगता है हेलमेट की गुणवत्ता का प्रचार कर रहे हैं.. या यूं कहें कि उसका दिन अच्छा रहा’, तर दुसऱ्या यूझरनं ‘हेल्मेटनं जागीच मृत्यू रोखला’, अशी टिप्पणी केली.