भारतातील प्रत्येक सणांचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. त्या त्या महिन्यांत येणा-या सणांना धार्मिक महत्त्व असले तरी त्यामागे काही शास्त्रीय कारणे देखील आहेत. आता हेच बघाना श्रावणात आपण हिंदू धर्मिय अनेक व्रतवैकल्य आणि उपवास करतो. हिंदू धर्मातील पवित्र महिना श्रावण मानला जातो पण या महिन्यात उपवास करण्याचे शास्त्रीय कारण देखील आहे. याकाळात अन्न पचायला जड असते त्यामुळे उपवास करणे किंवा हलकं पुलके याकाळात खाल्ले जाते. तसेच मकर संक्रांत या सणामागेही काही शास्त्रीय कारणे आहे. दरवर्षी १४ जानेवारीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. हा सण एक असला तरी भारताच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो.
Makar Sankranti 2017: तुम्हाला मकर संक्रांतीविषयी ‘या’ गोष्टी ठावूक आहेत का?
मकरसंक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी ख-या अर्थाने हिवाळा संपून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. पीक कापणीला येते आणि या आनंदात देशभरात वेगवेगळ्या राज्यात हा सण साजरा केला जातो. दक्षिण भारतात पोंगल, उत्तरेकडे लोहडी म्हणून तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने देखील हा सण ओळखला जातो. यादिवशी पीक कापणीला येते आणि त्याचा आनंद देशभर साजरा केला जातो. कुठे मक्याची भाकरी, तर कुठे पोंगल बनवून तर कुठे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून याचा आनंद साजरा केला जातो.
Makar Sankranti 2017: म्हणून मकर संक्रांतीला पतंग उडवला जातो
या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु होते. उत्तरायणात सूर्याची किरणे ही आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. थंडीत त्वचेचे अनेक रोग उद्भवात आणि या रोगांवर सूर्यांची ही किरणे रामबाण उपाय ठरतात त्यामुळे संक्रांतीत लोक उत्साहात घराबाहेर पडतात पतंग उडवतात. मकरसंक्रांतीनंतर हळूहळू दिवस मोठा होत जातो. पूर्वी आतासारखी विजेची सोय नव्हती त्यामुळे सारी कामे सुर्यास्तापूर्वी संपवावी लागत पण हिवाळ्यात दिवस छोटा असल्याने कामात खंड येई त्यामुळे सूर्यांचे जेव्हा उत्तरायण सुरू होई तेव्हा दिवस मोठा होई म्हणून या दिवशी सगळे आनंदात मकर संक्रात साजरी करतात. या दिवशी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये धार्मिक यात्रेला देखील प्रारंभ होतो. या दिवशी स्नान करून अनेक ठिकाणी सूर्य देवाला अर्घ्य दिले जाते.
Makar sankrant: जाणून घ्या.. मकरसंक्रांतीचा मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व