राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. देशभरात महागाई खूप वाढली आहे. प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. दरम्यान, १९६३ सालचे पेट्रोल पंपाचे एक बिल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पेट्रोलच्या बिलावरील रक्कम पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. १९६३ साली पेट्रोल इतकं स्वस्त होतं की तुम्हीही हे पाहून तोंडात बोटं घालाल. हे पेट्रोलचे बिल पाहून लोक विचार करत आहेत की, आज जर का या किमतीत पेट्रोल उपलब्ध असते तर आपण आपल्या गाडीतून संपूर्ण जग फिरू शकलो असतो. सोशल मीडियावरही याच बिलाची चर्चा आहे. चला तर मग पाहुयात १९६३ मध्ये पेट्रोलचा दर काय होता..
६० वर्षांपूर्वी पेट्रोलची ही किंमत होती
६० वर्षांपूर्वी म्हणजे १९६३ मध्ये पाच लिटर पेट्रोलची किंमत काय असेल याची कल्पना करा. सोशल मीडियावर एका बिलाचा फोटो व्हायरल होत आहे. पेट्रोल भरल्यानंतर पेट्रोल पंपाकडून ग्राहकाला बिल दिलं जायचं. यामध्ये २ फेब्रुवारी १९६३ ही तारीख लिहिली असून पाच लिटर पेट्रोलच्या किमतीसमोर ३ रुपये ६० पैसे लिहिले आहेत. कल्पना करा, केवळ ३ रुपयात ६० वर्षांपूर्वी या किमतीत ५ लिटर पेट्रोल मिळत होते.
एका लिटरची किंमत किती
आजकाल वाढत्या महागाईसोबत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किती वेगाने वाढत आहेत हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. एका व्यक्तीने बिलाचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, त्यावेळी पाच लिटर पेट्रोल तीन रुपये साठ पैशांना मिळत होते, म्हणजे एक लिटर पेट्रोलची किंमत ७२ पैसे होते. सोशल मीडियावर हे बिल व्हायरल होताच लोकांनी या बिलाच्या किमतीची आजच्या किमतीशी तुलना करायला सुरुवात केली. तर हे व्हायरल बिल पाहून नेटकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आठवले आहेत.
पाहा बिलाचा फोटो
हेही वाचा >> जेव्हा स्वप्न पूर्ण होते! आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे; माय-लेकाचा हृदयस्पर्शी VIDEO
हा फोटो आधीच व्हायरल झाला आहे, २०१५ पासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. ज्यावर लोक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.