आजकाल सोशल मीडियावर आपले मनोरंजन करणारे अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ असे असतात जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होतं. शिवाय वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे अनेक पेज असतात जिथे आपणाला असे मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. शिवाय मनोरंजक व्हिडीओ तयार करणाऱ्यांच्या विनोद बुद्धीला कधी कधी दाद द्यावीशी वाटते एवढे अप्रतिम व्हिडीओ ते तयार करत असतात.

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. शिवाय या व्हिडीओचा संदर्भ थेट राज्य सरकारने जाहीर केलेल्या एका निर्णयाशी आहे. तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्पात एसटीच्या तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ५० टक्के सवलततीची योजना लागू देखील झाली आहे. तर एवढ्या मोठ्या योजनेवर मीम करणार नाहीत ते नेटकरी कसले? त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या योजनेशी संबंदित अनेक मीम्स बनत असून ते तुफान व्हायरल होत आहेत.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Assembly Elections 2024 What is the type of home voting what are its benefits Nagpur news
गृहमतदान काय प्रकार आहे, त्याचे फायदे काय ?
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Megharani Jadhav
“धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी

हेही पाहा- पाकिस्तानातील तरुणाईला पडली ‘नाटू नाटू’ गाण्याची भुरळ; हर्ष गोयंकांनी शेअर केलेला भन्नाट Video पाहाच

अशातच आता एका कंडक्टरचा एसटीत तिकीट काढतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही थक्क तर व्हालच शिवाय हसून हसून तुमचं पोट दुखेल यात शंका नाही. 12_chyabhaavaat नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक बस प्रवाशांनी भरलेली दिसत आहे. या बसमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक नसल्याचं दिसत आहे. तर बसमध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यावेळी बसमधील कंडक्टरला तिकीट काढण्यासाठीही पुढे मागे जाता येत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेवटी कंडक्टर बसमधील सीटवरुन उड्या मारत जातो. हा व्हिडीओ पोस्ट करताना, महिलांना अजून सवलती द्या, असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

हेही पाहा- लग्न ठरलंय? सावधान! आधी कोर्ट मॅरेज नंतर घरच्यांच्या इच्छेने ७ फेरे; सासरी पोहोचायच्या आधीच पळाली नवरी, कारण…

हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने म्हटलं आहे, “महिलांना एसटीमध्ये ५० % सवलत दिल्याने त्या आता सतत माहेरी जाणार, त्या माहेरी गेल्या की माणसे दारु पिणार, अशा प्रकारे सरकारचा महसुल वाढणार, म्हणून महिलांना अर्धे तिकीट केले” आणखी एकाने एसटी महामंडळ आता फायद्यात जाणार असल्याचं म्हटलं आहे. तर काही महिलांनी हा व्हिडीओ जुना असल्याचं म्हटलं आहे.