Viral Video: एखादा सिनेमा बघण्याची खरी मजा ही चित्रपटगृहातच येते. मोठी स्क्रीन, स्पष्ट आवाज आणि मऊ-मऊ खुर्च्यांवर बसून चित्रपट बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण, काही प्रेक्षक येथेही स्वतःची मनमानी करतात. ते स्वतःचे अनोखे नियम बनविताना दिसतात. काही प्रेक्षक सिनेमा सुरू झाल्यावर येतात आणि मोबाईलची टॉर्च लावून सीट शोधत बसतात; तर अनेक जण मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिट्या वगैरे मारताना दिसतात. पण, आज तर हद्दच झाली आहे. काही प्रेक्षक सिनेमागृहात पुढच्या रांगेच्या सीटवर पाय विसावून बसलेले दिसत आहेत.

चित्रपटगृहात असताना, लोकांनी काही मूलभूत शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या कोणालाही त्रास किंवा त्रास देऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. पण, या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पीव्हीआर (PVR) मल्टिप्लेक्समध्ये काही प्रेक्षक पुढच्या रांगेतील सीटवर पाय ठेवून, मोबाईलची बॅटरी ऑन करून सिनेमा बघण्याचा आनंद लुटत आहेत. तसेच काही जण त्यांच्या मोबाईलमध्ये सिनेमासुद्धा रेकॉर्ड करून घेतला दिसले आहेत; जे खूपच चुकीचे आहे. या गैरप्रकारावर एका प्रेक्षकाने व्हिडीओद्वारे प्रकाश टाकला आहे. काय आहे या व्हिडीओत एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा …VIDEO: आई-वडिलांचे छत्र हरवले, हक्काचं मिळालं आश्रयस्थान; १८ वर्षांपूर्वी तरुणीला आधार देणाऱ्या ‘तिचा’ हा VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, या व्हिडीओने सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडलं आहे. कारण- या व्हिडीओत बहुतेक लोक मोबाईलद्वारे सिनेमा रेकॉर्डिंग करीत आहेत; जी सर्वच चित्रपट निर्मात्यांसाठी एक मोठी समस्या आहे. तसेच काही जण स्वतःच्या जागेवर बसल्यावर पुढच्या रांगेत असणाऱ्या खुर्चीवर पाय ठेवत आहेत. त्यामुळे तेथे बसलेल्या प्रेक्षकांना त्रास होतो आहे. या सर्व गोष्टी आपल्यातील अनेक करतात आणि सार्वजनिक ठिकाणी नेमके कसे वागायचे याचे भान विसरून जातात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @avhr797 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एक युजर म्हणतोय, “हे खरंच खूप आक्षेपार्ह आहे.” तर दुसऱ्याने कमेंट केली, “पुढच्या रांगेत खुर्चीवर पाय ठेवणाऱ्यांवर नजर ठेवून अशा प्रेक्षकवर्गाला चित्रपट चालू असताना सिनेमागृहातून बाहेर काढलं पाहिजे.” तर तिसऱ्याने कमेंट केली, “पुढची सीट रिकामी असेल तर ठीक आहे. पण, जर एखादा प्रेक्षक त्यावर बसला असेल, तर असं करणं खूप चुकीचं आहे.” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.