Viral Photo Shows Automatic Pani Puri Vending Machine: रस्त्याकडेला स्टॉलवरची पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? पाणीपुरी हा पदार्थ अगदी सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचा आहे. आपल्यातील बऱ्याच लोकांना बाहेरच्या चाट सेंटरवर, स्टॉलवर पाणीपुरी खायला अजिबात आवडत नाही. कारण काही विक्रेते त्यांचे स्टॉल किंवा दुकान स्वच्छ ठेवत नाहीत. त्यामुळे आपल्यातील बरेच जण घरी पाणीपुरी बनवून खाणं पसंत करतात. पण, जर पाणीपुरी विकल्या जाणाऱ्या स्टॉल किंवा दुकानात ऑटोमॅटिक मशीन आल्या तर तुम्हाला पाणीपुरी खायला आवडेल का? तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल (Viral Photo) होत आहे.
व्हायरल पोस्ट बंगळुरूची आहे. बंगळुरूमध्ये शहराचा स्वतःचा सोशल मीडिया ट्रेंड आहे, ज्याला “पीक बेंगलुरु मोमेंट” (peak Bengaluru moment) असं म्हणतात. जिथे वापरकर्ते दररोज शहरात घडणाऱ्या विचित्र, मजेशीर घटना शेअर करतात. तर अलीकडेच, बेंगळुरूच्या एचएसआर (HSR) लेआउटमध्ये एका अज्ञात व्यक्तीस स्टॉल दिसला. हा स्टॉल पाणीपुरी विक्रेत्या महिलेचा होता. पण, येथे हाताने नाही तर ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीनद्वारे पाणीपुरी ग्राहकांना दिली जाते. तुम्हीसुद्धा नक्की बघा ही व्हायरल पोस्ट…
हेही वाचा…‘शेवटी प्रेम…’ मालकाकडून म्हशीचे लाड; खरेदी केली चक्क सोनसाखळी; VIRAL VIDEO पाहून व्हाल थक्क
पोस्ट नक्की बघा…
व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, व्हेंडिंग मशीनसह पाणीपुरीचा स्टॉल उभारण्यात आला आहे; ज्याचे नाव ‘व्हॉट द फ्लेवर्स’ (What The Flavours) असं आहे. स्टॉलमध्ये गोड, तिखट फ्लेवर्ड पाणीपुरीसाठी वेगवेगळे असे चार नळ, गूगल पे स्कॅनर कोड, पाणीपुरीची किंमत लिहिलेला बोर्डसुद्धा आहे. या ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीनमागील संकल्पना स्वच्छता व पाणीपुरी खाताना ग्राहकांना फ्लेवर्स निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी आहे; जिथे एखाद्याला त्यांच्या पुरीत त्याच्या पसंतीचे पाणी तो घेऊ शकतो. एकूणच अशा मजेदार आणि भविष्यात जगणाऱ्या या पाणीपुरी स्टॉलने ग्राहकांनाही इम्प्रेस केलं आहे.
सोशल मीडियावर ही व्हायरल पोस्ट @benedictgershom या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘२०५० मध्ये जगणारा बंगळुरू’; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे. पोस्ट पाहून अनेक नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काहींना ही कल्पना प्रचंड आवडली आहे. तर एका युजरने “पाणीपुरीचे पाणी जे नळावाटे ओव्हरफ्लो होते… ते रिसायकल होते का?” असा प्रश्नही विचारला आहे. विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील हुस्न तेरा तौबा तौबा या गाण्याला अनुसरून एका युजरने “पानीपुरी तेरा तौबा तौबा,” अशी मजेशीर कमेंटदेखील केली आहे.