Bhandardara Viral video: पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. काहीजण समुद्र किनारी जातात, बोटींगचा आनंद घेतात. अशावेळी सांगूही पर्यटक एकत नाहीत. तरीही पर्यटक नसतं धाडस करतात आणि हेच धाडस त्यांचा अंगाशी येतं. तलाव, धरणे, समुद्रकिनारी अनेक पर्यटक फिरायला जात असतात. तर अशा ठिकाणी फिरायला गेल्यानंतर विशेष काळजी घेणे गरजेचे असते. समुद्रकिनाऱ्यावर बोटिंग करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण सध्या एका थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये १० ते १२ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट भंडारदरा डॅममध्ये बुडता बुडता वाचली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडणार तोच…
व्हायरल होत असलेला व्हिडिओ भंडारदरा डॅममधला असल्याचं बोललं जात आहे. या घटनेमध्ये पर्यटकांसहित बोट बुडताना दिसत आहे. एका पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे. तर या दुर्घटनेत बोट पाण्यात बुडणार तोच दुसऱ्या बोटमधून आलेले तरुण ती बुडण्यापासून वाचवतात. बोट सुखरुप बाहेर निघाल्यानंतर सर्व पर्यटक खूश होतात. ही सर्व थरारक घटना एका पर्यटकाने मोबाईलमध्ये शूट केली आहे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद
बोट निघाल्यापासून ही घटना फक्त २० सेकंदात ही घटना घडली आहे. राहुल बोरोले नावाच्या एका युवकानं हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. राहुल आणि त्यांच्या जोडीदारांनी यावेळी या सर्व प्रवाशांना वेळीच मदत करुन सुखरुप बाहेर काढलं. मात्र अशाप्रकारे पर्यटकांनी पोहता येत नसेल तर आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ए…तोंड सांभाळून बोल! मुंबई लोकलमध्ये दोन पुरुषांमध्ये राडा, VIDEO पाहून लावाल डोक्याला हात
ही घटना ५ दिवसांपूर्वी घडली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.