Bhopal Man beats shopkeeper Viral video: अनेकदा गैरसमजामधून वाद होत असतात. बऱ्याचदा हे वाद बोलून समजून मिटतात पण अनेकदा ते इतक्या टोकाला जातात की, त्याचे हाणामारीत रुपांतर होते. या भांडणात अनेकांना दुखापत होते तर काहींचा जीवही जातो. सध्या अशीच एक घटना मध्य प्रदेश भोपाळ येथे घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोपाळमध्ये एका धक्कादायक घटनेत, एका दुकानदाराने ग्राहकाला त्याच्या पत्नीसमोर “अंकल” (काका) अशी हाक मारल्याने ग्राहकाने दुकानदाराला क्रूरपणे मारहाण केली. मध्य प्रदेशच्या राजधानीतील जाटखेडी भागात विशाल शास्त्री यांच्या साडीच्या दुकानात ही घटना घडली.

हेही वाचा… माणुसकीला सलाम! तिचा जीव वाचवण्यासाठी त्यानं स्वत:चा जीव धोक्यात टाकला; पुढच्याच क्षणी ट्रेन आली अन…थरारक VIDEO

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, विशाल नामक दुकानदार रोहित नावाच्या ग्राहकाशी संवाद साधत होता. रोहित शनिवारी आपल्या पत्नीसोबत साडी खरेदी करण्यासाठी दुकानात गेला होता. खरेदी न करता अनेक पर्याय पाहिल्यानंतर, विशालने त्यांच्या पसंतीच्या किंमतीच्या रेंजबद्दल चौकशी केली.

यावर रोहितने “₹१,०००” रुपये असं सांगितलं व तो जोडून म्हणाला की तो अधिक महाग रेंजच्या साड्यादेखील खरेदी करू शकतो. यावर विशाल म्हणाला, “अंकल मी तुम्हाला दुसऱ्या रेंजमधीलदेखील साड्या दाखवेन” यामुळे रोहितमध्ये अनपेक्षित रोष निर्माण झाला, ज्यामुळे त्याने विशालला तो शब्द पुन्हा न वापरण्याचा इशारा दिला. यामुळे त्यांच्यात जोरदार भांडण झालं ज्यामुळे शेवटी रोहित आणि त्याच्या पत्नीला दुकानातून बाहेर काढण्यात आलं.

हेही वाचा… चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप

मात्र, काही वेळातच रोहित काही लोकांचा ग्रुप घेऊन तिथे आला. रोहित परतल्यावर परिस्थितीने हिंसक वळण घेतले. त्यांनी विशालला त्याच्या दुकानातून बळजबरीने रस्त्यावर आणले, जिथे त्यांनी त्याच्यावर लाठ्या आणि बेल्टने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्याला अनेक वेळा लाथा मारल्या.

हेही वाचा… ड्रममध्ये फटाका लावल्यानंतर काय झालं पाहा! VIDEO पाहून बसेल धक्का

विशाल, जखमी होऊन, जवळच्या पोलीस ठाण्यात पोहोचला, जिथे त्याने रोहित आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी नेण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी मनीष राजसिंग भदौरिया यांनी या तपशिलाला दुजोरा देताना सांगितले की, “रोहितवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhopal man beats shopkeeper for calling him uncle in front of his wife video viral mp dvr