भारतात तुम्हाला विविध धर्मांची मंदिरे प्रार्थनास्थळे दिसतील. या प्रत्येकांचे काहीना काही वैशिष्ट्ये आहे. पण भारतात अशीही काही मंदिरे आहेत जी या सगळ्यांहूनही वेगळी आहेत. अशा मंदिरांविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असाल किंवा त्याचे व्हायरल झालेले फोटोहो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. यातले एक मंदिर म्हणजे सिकंदराबादमध्ये असलेले ‘कुत्ते की कबर’ हे मंदिर. बुलंदशहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. गेल्या शंभर वर्षांपासून येथे असणा-या समाधीची पूजा केली जाते.

वाचा : म्हणून येथे ‘त्या’ बुलेटची पूजा केली जाते

या मंदिराबाबतही एक कथा ऐकिवात आहे. १०० वर्षांपूर्वी याठिकाणी सिद्धपुरूष लटूरिया बाबा राहायचे. त्यांच्या सोबत त्यांचा लाडका कुत्राही होता. लटूरिया यांना दिसायचे नाही. त्यामुळे त्यांना काही हवे असले की ते कुत्र्याच्या गळ्यात पिशवी अडकवत. ही पिशवी घेऊन त्यांचा कुत्रा गावभर फिरत असे, त्यामुळे या बाबांना मानणारे त्याच्या पिशवीत काहीना काही वस्तू भरुन देत. लटूरिया यांनी पुढे याच ठिकाणी समाधी घेतली. पण जाता त्यांनी आपल्या कुत्र्याची काळजी घेण्याची विनंतीही गावक-यांना केली. पण लटूरियाच्या जाण्यानंतर कुत्र्याने खाणे पिणे सोडले आणि त्याचाही काही दिवसांत मृत्यू झाला. गावक-यांनी येथेच त्याची समाधी बांधली. या मंदिराबाबात अशा अनेक कथा ऐकिवात आहेत.

वाचा : विनयभंग करणाऱ्या तरुणाला बंगळुरूच्या मुलीने शिकवला धडा

इतकेच नाही तर लोक या कबरीची पूजाही करतात. या मंदिरात फक्त सिंकदराबादमधले गावकरी येतात असे नाही तर मेरठ, लखनऊ सारख्या अनेक ठिकांहून लोक येतात. या कबरीजवळ ते नवस बोलतात. हा नवस पूर्णही होतो अशीही अनेकांची श्रद्ध आहे.

Story img Loader