सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदार पूनावाला यांनी रविवारी ट्विटरवर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना टॅग करत एक ट्वीट केले. सध्या या ट्वीटची सगळीकडे चर्चा होत आहे. अदार पूनावाला यांनी ट्विटरवर लिहिले की, “इलॉन मस्क जर तुम्ही ट्विटर विकत घेतले नाही तर, टेस्ला कारच्या उच्च-गुणवत्तेच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी त्या भांडवलापैकी काही रक्कम भारतात गुंतवा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही केलेली ही सर्वोत्तम गुंतवणूक असेल.”
या वर्षाच्या सुरुवातीला, मस्क म्हणाले होते की “अजूनही सरकारसोबत अनेक आव्हानांवर काम करत आहे.” भारतात टेस्लाच्या लॉन्चबद्दल काही अपडेट आहे का? असं एका वापरकर्त्याने विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.
(हे ही वाचा: पंडितजी बोलवत राहिले आणि वर वाट पाहत राहिला पण वधू…; बघा हा मजेशीर viral video)
(हे ही वाचा: अजब प्रेम कहाणी! विद्यार्थिनी चक्क शिक्षकालाच घेऊन पळाली; म्हणाली, “आता जगणं…”)
इलॉन मस्कची डील
इलॉन मस्कने गेल्या महिन्यात मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर या कंपनीला ४४ अब्ज डॉलर्सच्या करारात विकत घेण्याचा करार केला. त्यांनी या करारासाठी गुंतवणूकदारांच्या गटाकडून ७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे.