लहान मुलांना शाळेत शिक्षकांनी दिलेला गृहपाठ जणू एक शिक्षाच वाटते. त्यांना फक्त मैदानी खेळ खेळण्याची आवडत असते. लहान मुलांच्या सतत मागे लागून, त्यांना बाजूला बसवून त्यांच्याकडून गृहपाठ पूर्ण करून घ्यावा लागतो. अशा अनेक तक्रारी पालक करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीतरी घडलं आहे. एका चिमुकल्याने चक्क गृहपाठ न करण्यासाठी थेट पोलिसांना कॉल केला आहे.
लहान मुलं गृहपाठ करण्यासाठी कोणतं कारण शोधून काढतील याचा काही नेम नाही. तर आज चीनमध्ये राहणाऱ्या एका सात वर्षाच्या चिमुकल्याने जबरदस्त जुगाड केला आहे. चिमुकल्याला अभ्यास करायचा नसतो, म्हणून तो इमर्जन्सी नंबर डायल करतो आणि पोलिसांना सांगतो की, बाबांनी मला मारलं. हे ऐकताच काही वेळात अधिकारी त्याच्या घरी भेट देतात आणि या प्रकरणाची तपासणी करतात.
हेही वाचा…कुटुंबाची रोड ट्रिप सुरू असताना गाडीच्या एसी व्हेंट्समधून बाहेर आला साप अन्… थरारक Video व्हायरल
अधिकारी चिमुकल्याच्या पाठीवर हात फिरवतात आणि बाबा तुला मारतात हे खरं आहे का ? असे विचारतात. तेव्हा चिमुकला होकारार्थी मान हलवतो. बाबांवर मारल्याचा आरोप केल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता असते. काही वेळ विचापूस केल्यानंतर अधिकाऱ्यांना समजते की, चिमुकल्याला शाळेत जायचे नसते. कारण त्याचा गृहपाठ पूर्ण झालेला नसतो. म्हणून अगदीच हुशारीने चिमुकला अभ्यास न करण्यासाठी व शाळेत न जाण्यासाठी अशी विचित्र युक्ती शोधून काढतो.
कोणालाही पूर्वकल्पना न देता पोलिसांना फोन केलेला पाहून चिमुकल्याच्या हुशारीचे अनेकांना आश्चर्य वाटले. दरम्यान, अधिकाऱ्याच्या सौम्य प्रतिसादाचेही कौतुक करण्यात येत आहे. तसेच खोटे पोलिस अहवाल देण्याचे गांभीर्य मुलांना शिकवण्याची गरजही व्यक्त केली. या चिंतेला उत्तर म्हणून चिनी सरकारने आता मुलांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत ; असे सांगण्यात येत आहे.