विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करणे ही शिक्षकांची आणि शाळेची जबाबदारी असते. विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. यासाठी जगभराती शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. चीनमधील शाळेमध्ये राबवलेल्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. चीनच्या शाळांमध्ये बेडमध्ये रुपांतर होणारे ‘डेस्क’ बसवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात आणि लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेमध्ये सकारात्मक बदल लक्षात घेऊन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालक आणि शिक्षकांनी स्वागत केले आहे.
विद्यार्थ्यांची तंदुरुस्ती आणि मानसिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी, चीनमधील काही शाळांनी पारंपारिक वर्गामध्ये एक सकारात्मक बदर केला आहे. चिनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना झोपता यावे यासाठी खास ‘डेस्क’ तयार केले आहे जे काही मिनिटांत बेडमध्ये रूपांतरित होतात.
हेही वाचा – पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये सीटची उशी झाली गायब! एअरहोस्टेस म्हणाली, “सीट खाली शोधा”
हे ‘डेस्क’ने शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये नव्याने भर टाकली आहेत, ज्यामुळे मुलांना ठरवून दिलेल्या विश्रांती कालावधीत झोप घेता येते. हे ‘डेस्क’ फोल्ड करण्यायोग्य आहेत.
मुलांच्या बौद्धिक वाढीस आणि एकूणच मानसिक आरोग्यास समर्थन देण्यासाठी विश्रांतीचे महत्त्व ओळखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “चीनमध्ये शिक्षणाकडे अधिक सर्वांगीन दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे याबाबत जागरूकता वाढत आहे. आणि, हा उपक्रम शिकण्याच्या प्रक्रियेवर बदल दर्शवितो, शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे शैक्षणिक यशाशी जोडलेले आहे यावर जोर दिला जात आहे.”
हेही वाचा – “आईवर ओरडू नका”; पालकांच्या भांडणात चिमुकलीने घेतली धाडसी भूमिका, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ
एक्सवर(ट्विटर) एकाने लिहिले, “अशी शाळा असती खरचं असावी असे मला वाटते,”. दुसरा म्हणाला, “काय नाविन्यपूर्ण ‘डेस्क सिस्टम’. “हे खरोखरच विद्यार्थ्यांना आरामादायी आणि शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे.”
तिसऱ्याने प्रतिसाद दिला, “काश, आमच्याकडे ते कामाच्या ठिकाणी असते!”