देशभरात २६ ऑगस्टरोजी भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणजेच कृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीनुसार, रात्री १२ वाजा श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. लाडक्या कृष्णासाठी दह्याचा नैवद्य दाखवण्यात आला. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकालानिमित्त सर्वत्र उंच उंच दहीहंड्या लावल्या जातात. मुंबई पुण्यामध्ये सर्वात उंच दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून एकावर एक असे सहा ते सात थर रचून हे गोविंदा मानवी मनोरा उभारतात आणि उंचावर बांधलेली दहीहंडी फोडतात. चौकाचौकामध्ये दहींहडी पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होते.
सोशल मीडियावर उंच उंच थर लावून दहींहडी फोडणाऱ्या गोविंदाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. दरम्यान, आणखी एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे ज्यामध्ये गोविंदांनी मानवी मनोऱा उभारून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला हा प्रसंग सादर केला आहे.व्हिडिओ नेटकऱ्यांनी प्रचंड आवडला आहे.
गोविंदानी सादर केला अफझल खानाच्या वधाचा प्रसंग
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की दहीहंडी फोडण्यासाठी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून एकवर एक थर रचून मानवी मनोरा उभारतात त्याचप्रमाणे या गोविंदानी हा मनोरा उभारला आहे. हा मनोरा तीन थरांचा असल्याचे दिसते. दुसऱ्या थरामध्ये उभ्या असलेल्या गोविंदानी हातात मोठी फी पकडली आहे जेणेकरून अभिनय करणाऱ्या गोविंदाना त्यावर उभे राहता येईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या वेशभुषीतील कलाकार तिसऱ्या थरावरील फळीवर सावधपणे उभे राहतात. दोघेही कलाकार अफझल खानाचा वधाचा प्रसंग सादर करतात. तसेच अफझलखानाचा वधाचा पोवाडा ऐकून येत आहे. इतक्या उंचावर उभे राहून अभिनय करणे खरचं कौतूकास्पद कामगिरी आहे.
Viral Video पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर उभा राहिला काटा
इंस्टाग्रामवर maharashtrian_admin नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दहीहंडी उत्सवात असं काही बघितले की मान गर्वाने उंचावते. आपला इतिहास आपला स्वाभिमान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे.” तसेच, “दहीहंडी फक्त सण नाही उत्सव आहे! असा मजकूर लिहिल्याचे व्हिडीओवर दिसते.
व्हिडिओ शेअर करताना एकाने कमेंट करून सांगितले की, ” हे मालाड पुर्व येथीलशिवसागर गोविंदा पथक आहे.”
दुसरा म्हणाला, “अंगावर काटा आला दादा”