हल्लीच्या तरुण मंडळींना किंवा खवय्यांना चवदार व चमचमीत खाद्यपदार्थ लागते. बदलेल्या जीवनशैलीनुसार माणसांने बरीच प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान व विकसित गोष्टी आणून त्यांने चुलीसारख्या गोष्टींचे गॅसमध्ये रुपातंर केले. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा पर्याय माणसांने शोधून काढला आहे.परंतु, गेल्या काही काळापासून शहरातील लोकांना गावाकडच्या जेवणाची चव आवडू लागली आहे. चुलीवर बनवलेल्या पिठल भाकरीची चव काही औरचं… झणझणीत रस्सा व भातासोबत शहरातील माणसं चवीने या गोष्टी खातात. मुंबईसारख्या शहरातील वातावरण देखील बदलेले दिसत आहे. निसर्ग, शांतता व चुलीवरच्या जेवणाची चव चाखण्यासाठी माणूस सुट्टीच्या दिवशी गावाकडे परतताना दिसत आहे.
मात्र कामानिमित्त जे भारताबाहेर राहतात त्यांना मनात आलं आणि गाव गाठलं असं करता येत नाही, मग बाहेरच्या देशात ते सुद्धा आपलं भारतातील पारंपारिक पद्धतीनं केलेलं जेवण मिस करतात. मात्र आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये सासू सुना चक्क युरोपमध्ये चुलीवर स्वयंपाक करत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपले चुलीवरचे जेवण तेही युरोपमध्ये या भारतीय सासू सूना करत आहेत. या दोघींनीही आपली पंरपरा युरोपात जपण्याचा प्रयत्न केला आहे, कारण दोघींनीही जेवण करताना नऊवारी साडी नेसली आहे, नाकात नथ, हिरव्या बांगड्या असा पारंपारिक लूक आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Mount Everest: माउंट एव्हरेस्टच्या टोकावरून असे दिसते ‘जग’, आनंद महिंद्रांनी शेअर केला ३६० डिग्रीचा Video
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून @komalthosare_official नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत तर, नेटकरीही यांचं कौतूक करत आहेत.