गुजरातमधील एक धक्कादायक घटना उघडकीस समोर आली आहे. ती म्हणजे अहमदाबाद येथे एका नेपाळी तरुणाला चोर समजून काही लोकांनी बेदम मारहाण केली. या जमावाने नेपाळी तरुणाला चोर समजून एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आजूबाजूला उभे असलेले लोक मारहाणीच्या घटनेचे व्हिडिओ शूट करत होते पण कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील चांगोदरजवळ ही घटना घडली आहे. असून चांगोदर औद्योगिक परिसरात एक नेपाळी तरुण वॉचमन म्हणून काम करत होता. सोमवारी रात्री तो आपल्या घरी जात असताना स्थानिक लोकांनी त्याला चोर समजून गंभीर मारहाण केली ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, वॉचमन म्हणून काम करणाऱ्या तरुणाने चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने बेदम मारहाण केली.

हेही पाहा- “दिवसा किस आणि रात्री…” भरदिवसा महिलेला जबरदस्ती किस करणाऱ्या ‘सिरियल किसर’चा Video व्हायरल

या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला असून त्यामध्ये त्या तरुणाला मारहान करताना शेजारी मोठा जमाव उभा असल्याचंही दिसत आहे. दुर्देवाची बाब म्हणजे एवढा मोठा जमाव असतानादेखील त्या तरुणाच्या मदतीला कोणीही गेलं नाही. सर्वजण केवळ तो तमाशा बघत राहिले आणि वॉचमनला मारहाण करतानाचा व्हिडिओ आपापल्या मोबाईलमध्ये शूट करत राहिले.

हेही पाहा- माणसं नव्हे ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकल्या चक्क टेस्ला कार; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण वॉचमनला मारहाण करणाऱ्या लोकांनी पोलिसांना पाहताच पळ काढला. पोलीस तिथे पोहोचले पण गंभीर मारहाणीमुळे वॉचमन जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी वॉचमनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत व्हिडिओच्या आधारे तत्काळ १० जणांना अटक केली असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. शिवाय या सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Story img Loader