उत्तर प्रदेशामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. ती म्हणजे माशांचा त्रासामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कदाचित हे वाचून तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण ही सत्य परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील अनेक गावातील लोक माशांच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत. शिवाय या माशांच्या त्रासाला कंटाळून अनेक महिला आपल्या माहेरी निघून गेल्या आहेत त्या परत यायला तयार नाहीत. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाली आहे तर या माशांमुळे तब्बल ५ हजारांहून अधिक लोकं त्रस्त झाले आहेत.
आपल्या कानाजवळ एखादी माशी फिरु लागली तर आपणाला ते नकोसं वाटतं, पण इथल्या लोकांना तर खातापिता, झोपतानाही माशांचा सामना करावा लागतो आहे. अक्षरश: इथल्या लोकांच्या अंगावर नेहमी बसूनच असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. माश्या वाजू लागतात, त्यामुळे लोकांची झोप मोड होतं आहे. माशांच्या या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून येथील नागरिकांनी अनेक आंदोलनं केली, तक्रारी दिल्या तरिदेखील या प्रकरणाची दखल घेतली जात नाही. स्थानिक प्रशासन प्रदूषण विभागाची जबाबदारी सांगून टाळाटाळ करत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या घटनेबाबतचे वृत्त आजतकने दिलं आहे.
हेही वाचा- पुस्तक देण्याच्या बहाण्याने गेली ती परतलीच नाही, माहेरी आलेली तरुणी प्रियकरासोबत पळाली
पोल्ट्रीमुळे माशांचा त्रास –
येथील नागरिकांनी सांगितलं की, ‘अहिरोरीचील कुईया गावामध्ये २०१४ साली केंद्र सरकारच्या वित्त पोषित कुक्कुट योजनेअंतर्गत साहवान येथे पोल्ट्रीची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून माशांची समस्या उद्भवत असल्याचंही स्थानिकांनी सांगितलं. शिवाय या ठिकाणी दर दिवशी दीड लाख कोंबड्यांच्या अंड्यांचं उत्पादन होतं. येथील उत्पादनाची क्षमता वाढेल तसं ग्रामस्थांना होणारा माशांचा त्रास वाढतो.’
माशांमुळे ५ हजार लोक हैराण –
हेही वाचा- ऐकावं ते नवलच! पोलिसांनी मारला पोलिसांच्या गाडीवर डल्ला; डिझेलचा मोह अंगलट आला…
दरम्यान येथील श्रवणकुमार वर्मा नावाच्या एका व्यक्तीने सांगितलं की, “गावात मागील वर्षात ७ विवाह झाले होते. पण यंदाच्या हंगामात एकही लग्न या ठिकाणी ठरलं नाही. याचं कारण म्हणजे माशांच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी कोणतेही पालकं आपली मुलगी या ठिकाणी द्यायला तयार नाहीत.”
माशांमुळे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर –
माशांच्या त्रासाला कंटाळून गावातील शरदची पत्नी तिच्या माहेरी गेली असून ती सासरी परत येण्यास तयार नाही. त्यामुळे शरद आणि त्याच्या पत्नीचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे मुंगालालची बायको शिवानीही माशांच्या त्रासामुळे गावात रहायला तयार नाही. शिवानीने सांगितलं की, “गावामध्ये माशांचा प्रादुर्भाव एवढा वाढला आहे की सर्व जनजीवन विस्कळीत झालं आहे.”
पोल्ट्री जवळ लोकांनी घरं बांधली ?
पोल्ट्री फार्मचे मालक दलवीर सिंग यांनी मात्र गावकऱ्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “जेव्हा फार्म स्थापन केला तेव्हा त्यांनी प्रदूषण विभागाकडून एनओसी (NOC) घेतली होती. शिवाय पोल्ट्री फार्म लोकवस्तीपासून दूर बांधण्यात आला होता. नंतर काही लोकांनी पोल्ट्रीजवळ घरे बांधली. तर माशांवर नियंत्रण ठेवण्यासाठीची सर्व व्यवस्था करण्यात आली असून याबाबत अनेकदा चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये कोणतीही कमतरता आढळलेली नाही. शिवाय या लोकांची नाती तुटण्यामागे अन्य काही कारणं असेल, माशांमुळे संसार उद्ध्वस्त होत आहे हे सांगण चुकीचं आहे.”