नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर चर्चा झाली ती बेवफा सोनम गुप्ताची. ही सोनम गुप्ता नक्की कोण आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. काही वर्षांपूर्वी दहा रुपयांच्या नोटेवर कोणीतरी ‘सोनम गुप्ता बेवफा है ‘ असे लिहिले होते. या नोटाचे काही फोटो तेव्हा सोशल मीडियावर गाजले होते. नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर नवीन दोन हजार रुपयांच्या नोटेवरही तेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ज्या विषयाची इतक्या मोठ्या प्रमाणत चर्चा आहे तो विषय IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रश्नपत्रिकेत आला नाही तर नवलच म्हणावे लागले.
वाचा : २ हजारांच्या नोटेवरही ‘बेवफा’ सोनम
आयआयटी गुवाहटीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रश्नपत्रित एका प्राध्यपकाने ‘सोनम गुप्ता बेवफा है’ वर एक प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायला दिला होता. वारंवारता म्हणजे प्रोबेबिलिटी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. विद्यार्थ्यांनी याचे काही फोटोही सोशल मीडियावर टाकले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवले देखील आहे. यातल्या काही उत्तर पत्रिकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर दुसरीकडे आयआयटी दिल्लीच्या सोशिओलॉजीच्या प्रश्नपत्रिकेत देखील नोटाबंदीचे पडसाद पाहायला मिळाले. या प्रश्नपत्रिकेत देखील नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील आत्महत्या कमी होतील की वाढतील ? यावर प्रश्न विचारला होता. आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हा प्रश्न सोडवल्याचे देखील प्राध्यापकांनी म्हटले आहे.
नोटांबदीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर सोनम गुप्ताच्या बेवफाईचे चर्चे रंगले होते. ही सोनम गुप्ता नक्की कोण याचा शोध घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. कित्येकाने तर ‘सोनम गुप्ता बेवफा है’ हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला संदेश नसून तो नोटाबंदीच्या निर्णयाचा गुप्त संकेतिक शब्द असल्याची थिअरी देखील मांडली होती. ही सोनम गुप्ता इतकी व्हायरल झाली होती की क्रिकेटच्या मैदानपर्यंत तिचे किस्से पोहचले होते. तिला ‘नॅशनल बेवफाच’ घोषीत करा असे विनोद देखील रंगले होते.
VIDEO: ‘बेवफा’ सोनमवर कपिल देव आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण म्हणतात..