जागतिक चिमणी दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. जगातील अनेक देशांमध्ये चिमण्या आढळतात. लोकांमध्ये जागरूकता आणि चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वाढत्या प्रदूषणासह अनेक कारणांमुळे चिमण्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परंतु निसर्ग आणि सर्व सजीवांबद्दलचे प्रेम प्रकट करण्यासाठी अहमदाबादमधील ढल नी पोल, अस्टोडिया येथील एका चिमणीला समर्पित एकमेव फलक आहे.
IFS अधिकांऱ्याची पोस्ट
IFS अधिकारी परवीन कासवान यांनी पोस्ट करत याविषयी माहिती दिली. ते लिहतात की, ” आज #WorldSparrowDay आहे. ज्यांची गाणती दिवसेंदिवस कमी होत आहेत. पण आज एक अनोखी गोष्ट शेअर करायची आहे. चिमणीला समर्पित जगातील एकमेव फलक अहमदाबादमध्ये आहे. मार्च १९७४ मध्ये पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेल्या चिमणीला समर्पित हा फलक आहे. लोक सुंदर असतात!!”
संरचनेच्या वरच्या भागात इंग्रजी आणि गुजराती दोन्ही भाषेत कोरलेले संदेश आहेत, तर संरचनेच्या खालच्या भागात चिमणीचे एक लहान शिल्प आहे, पानांभोवती पुष्पहार आहे.
(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)
(हे ही वाचा: जंगलाचा राजा सिंहाची म्हशींनी केली दयनीय अवस्था! बघा Viral Video)
जगात कदाचित अहमदाबाद हे एकमेव ठिकाण आहे जिथे चिमणीची आठवण करून देणारा हा फलक आहे. या पोस्टबद्दल हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे चिमणीच्या मृत्यूची वेळ आणि कारणे यांविषयीचे सूक्ष्म तपशील नमूद केले आहेत.