Manali viral video: सध्या भारतात थंडी वाढत आहे. हिमाचल प्रदेशातील मनालीमध्येही सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. या दिवसात खूप बर्फवृष्टी होत असते मात्र तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बर्फवृष्टी कमी आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अनेकजण फिरायचा प्लॅन करतात. अनेकजणांना बर्फ बघण्याची, त्यात खेळण्याची फार इच्छा असते. दरम्यान, अशाच एका व्यक्तीला बर्फात मस्ती करणं जरा महागात पडलं. ही व्यक्ती बर्फात उंचावरून घसरत घसरत १०० मीटरपर्यंत फरफटत गेली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही भीती वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बर्फात सुमारे १०० मीटर घसरत गेला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लोक थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत. पण तेवढ्यात एका महिलेसोबत बसलेला एक माणूस बर्फावरुन घसरतो. आणि तो सुमारे १०० मीटर खाली सरकायला लागतो. मधोमध एक जोडपंही एका मुलाला मांडीवर घेऊन बसलं आहे. यावेळी तो घसरत त्यांच्या अंगावर जाऊन मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र ते जोडपे आपल्या बाळाला घेऊन वेळीच बाजुला झाले.

जेव्हा काही लोक या व्यक्तीला खाली येताना पाहतात. त्यावेळी ते त्याला वाचवण्यासाठी धावतात. दरम्यान, दोन जण उडी मारतात पण त्यांना पकडता येत नाही. शेवटी जेव्हा ती व्यक्ती खाली येते. मग त्याला पाहण्यासाठी लोक जमतात. @shabdvini नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास २.५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मूकबधिर महिला अडकली लिफ्टमध्ये; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरताना दरवाजा बंद झाला अन्…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘मी असते तर मेले असते.’ आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘हा माणूस बर्फ पाहण्यासाठी कुठेही जाणार नाही.’ दरम्यान आणखी एका युजरने लिहिले, ‘कोणती ट्रेन आहे, खूप वेगाने धावते आहे.’