हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकारने अनेक कडक कायदे केले आहेत. हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद देखील या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. मात्र, समाजातून हुंडा प्रथा पूर्णपणे नष्ट झालेली नाही. कारण आजही अनेक लोभी लोक हुंड्यासाठी महिलांचा छळ करत असतात. मात्र, अशा लोकांना धडा शिकवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हुंड्यात बाईक मागणाऱ्या नवरदेवाला सासरा चप्पलने मारहाण करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरदेव लग्नाच्या पोषाखात तयार होऊन उभा राहिल्याचं दिसत आहे, त्याच्यासोबत वधू देखील आहे. यावेळी नवरदेव हुंड्यात बाईकची मागणी करतो, नवरदेवाने बाईकची मागणी करताच सासरा रागवतो आणि नवरदेवाला चप्पलने मारहाण करायला सुरुवात करतो. सासरे नवरदेवाला केवळ मारहान करुन थांबत नाहीत, तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची भाषा करत असल्याचं व्हिडीओत एकू येत आहे. व्हिडिओच्या शेवटी नवरदेव केलेल्या चुकीबद्दल सासऱ्यांची माफी मागताना दिसत आहे.
मात्र या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही. काही लोकांचा दावा आहे की, हा व्हिडिओ समाजातील हुंडा प्रथेविरोधात संदेश देण्यासाठी बनवला आहे. तर काही लोक याला स्क्रिप्टेड असल्याचं म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये नवऱ्याला मारहाण करणारा व्यक्ती हा मुलाचा बाप आहे, मात्र लोक त्याला सासरा असल्याचं म्हणत आहेत, अशा कमेंट्सदेखील काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, हुंडा मागणाऱ्या अशा लोकांना आपली मुलगी कधीही देऊ नये. अशा लोकांना तुमची मुलगी देऊन तुम्ही तिला मरणाच्या दारात ढकलत आहात. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, सर्वच वडिलांनी हे काम केले पाहिजे, आजच्या काळात हुंडा हा एक शाप बनला आहे. दरम्यान, अनेक नेटकरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.