Viral Video: दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजांची विशेष काळजी घेते असते. पण, काही प्रवासी असे असतात; जे सोयींचा गैरफायदा घेतात. ते रेल्वेस्थानक, ट्रेनमध्ये कचरा फेकतात; तसेच पान, तंबाखू खाऊन थुंकतानासुद्धा दिसतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात कल्याण स्थानकावर ट्रेन थांबलेली असताना एक व्यक्ती गुटखा खाऊन खिडकीबाहेर कचरा टाकताना दिसून आली.
मुंबई लोकलमधून प्रवास करताना एक व्यक्ती गुटखा खाण्यासाठी पाकीट फोडते आणि खिडकीच्या बाहेर फेकून देते. ही लज्जास्पद कृती पाहून एका सहप्रवाशाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, ती व्यक्ती दुर्लक्ष करून, “कचरा फेकला, तर काय झालं? कर्मचारी येऊन साफ करतील. आपण त्यांना मेंटेनन्स देतोच ना.” असे उद्धट उत्तर देताना दिसली आहे. त्या दोघांमध्ये नक्की बोलणे काय झाले ते एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, ट्रेनमधून प्रवास करणारा गुटख्याचे पाकीट उघडतो आणि पाकीटरूपी कचरा खिडकीखाली फेकून देतो. ते व्हिडीओद्वारे रेकॉर्ड करणारा अज्ञात सहप्रवासी त्याला विनवणी करतो, ‘गुटख्याचे पाकीट खिशात ठेवा आणि नंतर ते कचराकुंडीत टाकून द्या.” त्यावर गुटखा खाणारा त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून, “मी रेल्वेला यासाठी मेंटेनन्स देतो”, असे अरेरावीचे उत्तर देतो. हे ऐकून सहप्रवासी त्याला, “यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला पाहिजे, असे म्हणतो. तेव्हा गुटखा खाणारा, “हो, मला पुरस्कार द्या,” असे उर्मटपणे उत्तर देतो.
१७ एप्रिल रोजी धर्मेश बाराई यांच्या @dharmeshbarai एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच “हे जेंटलमन रेल्वेला कचरा आणि घाण करण्यासाठी मेंटेनन्स देतात” अशा मानसिकतेच्या लोकांनी ट्रेनमधून प्रवास करण्याची गरज नाही, अशी कॅप्शन पोस्टला दिली आहे. त्या बेफिकीर माणसाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संतापले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “हा माणूस सरकारला मेंटेनन्स देतो; जेणेकरून तो कचरा टाकू शकेल. कृपया त्याला चांगला धडा शिकवा.” तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे, “या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसून आले आहेत.