Viral video: ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा वाहतूकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात. अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात. दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत. एका तरुणीनं वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले. ट्रॅफिक पोलिसांचे अनेक किस्से आपण ऐकले आहे. सोशल मीडियावरदेखील अनेक नागरिकांनी शेअर देखील केले आहेत. चुकीच्या गोष्टींवर लगाम घालणं आणि शिक्षा करण्याचं काम खाकीचं असतं मात्र काही असे महानग असतात जे नियमांचं उल्लंघन करत पोलिसांशी वाद घालतात. अशाच एका महिलेनं चक्क मुंबई पोलिसांच्या अंगावर कार घातली आहे.

“जा काय करायचंय ते करा मला फरक नाही पडत, व्हिडीओ बनवा, वडिलांनी बोलवा काहीच होणार नाहीये” या शब्दात एक महिला पोलिसांशी वाद घालत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणीनं वाहतुक नियम मोडल्यामुळे तिला वाहतूक पोलिसांनी तिची गाडी थांबवली आहे. मात्र यावेळी ती पोलिसांसोबत वाद घालत कार थांबवायला तयार नाहीये. एवढंच नाहीतर या महिलेनं अक्षरश: पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. यावेळी या वाहतूक पोलिसांनी मुंबई पोलिसांना मध्यस्थी करायला बोलावलं मात्र ही महिला मुंबई पोलिसांशीही वाद घालायला लागली. पुढे ती, “तुम्हाला हवं ते करा, पण मी गाडीतून खाली उतरणार नाही. तुम्ही माझ्या गाडीचा फोटो काढा, व्हिडीओ काढा किंवा अन्य काहीही करा, महिला पोलीस असल्याशिवाय मी तुम्हाला दाद देणार नाही.” असं रोखठोक उत्तर देत ती महिला निघून गेली. हा व्हिडीओ पाहून आता तुम्हीच सांगा या प्रकरणात खरी चूक कोणाची आहे?

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DIafrKsqMkb/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shahaanpana.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संताप व्यक्त करत आहेत. यावर एकानं म्हंटलंय की, “महिला आहे म्हणून बोलत बसले माणूस असता तर डायरेक्ट मारायला सुरुवात केली असती. जेंव्हा गाडीत पुरुष असतो तेंव्हा पण असंच समजावून सोडत जा.”