कधी कधी अशा काही घटना पाहायला मिळतात, ज्या पाहून अंगावर लगेच काटा येतो. रस्त्यांवरील भीषण अपघातांच्या घटनांचा यात समावेश असतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या घटनेचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, पण अत्यंत धोकादायक आहे. आजकाल शहरात उंचच उंच बिल्डिंग पाहायला मिळतात. मात्र कधी कधी यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बोंबाबोंब पाहायला मिळते. कधी इमारतीतील लोकांना या असुविधांचा त्रास होतो तर कधी कधी या बिल्डिंगधील लोकांचा खाली रस्त्यावरील लोकांना त्रास सहन करावा लागतो.
तुम्ही कल्पना करा एखाद्या उंच इमारतीतून लोखंडाची एखादी वस्तू खाली पडली तर काय होईल? नुसता विचार करुनच घाम फुटला ना, पण ही घटना खरंच धडली आहे. वरळीत एका ४० माळ्याच्या उंच बिल्डिंगच्या टेरेसवरुन लोखंडाचा खांब खाली रस्त्यावर पडल्याची घटना घडलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
गाडीचा चुरा अन् व्यक्तीचा…
ही घटना १९ ऑगस्टला घडली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वरळीतील ४० माळ्याच्या बिल्डिंगमधून एक मोठा खांब खाली रस्त्यावर पडला. २० ते २५ फुटाचा हा खांब नशीब रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीवर पडला, मात्र बाजूलाच दुचाकीवर थांबलेल्या एका व्यक्तीच्या हाताला यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये सुदैवानं कुणाचाही जीव गेला नाही. मात्र अशाप्रकारे नेहमी गाड्यांची गर्दी असणाऱ्या रस्त्यावर अशा घटना घडत असतील तर सुरक्षएचा प्रश्न पुढे येतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: मेट्रोमध्ये महिलांची दे दणादण फायटिंग, पाय लागला म्हणून एकमेकींच्या झिंज्या उपटल्या
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. “पूर्वी लोक बोलायची खाली बघून चालावं…..आता वाटतं वरती बघून चालावं लागेल” अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे.