दिवसेंदिवस चोरट्यांचा सुळसुळाट वाढत आहे. अनेकदा भरदिवसा रस्त्यावर चोरीच्या घटना घडतात तर कधी रात्रीच्या अंधारात चोरटे मौल्यवान वस्तू चोरून पळ काढतात. दरम्यान चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या आधी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांचे देवाच्या पाया पडून मग चोरी करतानाचे व्हिडिओ समोर आले आहे. तर एका घटनेत चोरट्यांना व्यक्तीची दया आल्याने चोरीचा ऐवज परत केल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान आता एका विचित्र चोरट्यांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
नुकत्याच घडलेल्या घडनेत भुकेल्या चोरट्यांनी असे काही केले आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसावी. अलीकडेच नोएडाच्या सेक्टर ८२ परिसरामध्ये अनेक घरांमध्ये चोरट्यांनी लाखोंच्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
तुम्ही कदाचित चोरट्यांनी मौल्यवान वस्तू चोरल्याचं ऐकलं असेल पण कधी चोरट्यांनी स्वयंपाकघरात काही बनवून ऐकलं आहे का? होय, तुम्ही जे वाचत आहे ते योग्य आहे करण अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. नोएडाच्या सेक्टर ८२ मधील घरांमध्ये शिरलेल्या चोरट्यांच्या टोळीने मौल्यवान वस्तू चोरल्याच पण चोरी करून जाण्याआधी स्वयंपाकघरात जाऊन गरमा गरम भजी तळून खाल्ली आहे. ही विचित्र घटना ऐकून लोकांना आश्चर्य व्यक्त केले आहे. ही घटना समजल्यानंतर लोकांना हसू आवरत नाही ना.
अशाच एका घटनेत चोरांच्या याच टोळीने सेक्टर २५ मध्ये रिचा बाजपेयीच्या घरातून ३ लाख रुपयांचे दागिने पळवले. त्यांच्या चोरी करून जाण्याआधी त्यांनी बिडी, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, पान खाऊन बाथरूममध्ये थुंकले होते.
या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस उपअधीक्षक हृदेश कथेरिया यांनी घोषणा केली की, चोरांचा माग काढण्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.
एका दिवसात सहा घरे लुटल्या गेल्याने नोएडाच्या सेक्टर ८२ मधील रहिवासी कुलूपबंद करून भीतीने घरातच राहत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd