मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएमने आपला IPO लॉंच केला आहे. कंपनीच्या IPO ची सुरुवात सुस्त झाली असली तरी या कंपनीने एका झटक्यात त्यांच्या ३५० कर्मचाऱ्यांना करोडपती बनवले. तसेच यावेळी शेअर बाजारात लिस्टिंग होण्यापूर्वीच कंपनीचे ३५० कर्मचारी हे करोडपती झाले आहेत. रॉयटर्सच्या बातम्यांनुसार, कंपनीची सूची १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे, परंतु त्यापूर्वी पेटीएमच्या $ २.५ बिलियन आयपीओमुळे कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचार्यांचा समावेश असलेल्या ३५० कर्मचार्यांची एकूण संपत्ती १ कोटी रुपये असणार आहे. खरे तर कंपनीच्या या कर्मचाऱ्यांनी पेटीएममध्ये गुंतवणूकदार म्हणून भागीदारी केली होती.
पेटीएमने त्यांचा आयपीओ(IPO) लॉंच केला आहे. कंपनीच्या या शेअर्सचे वाटप १५ नोव्हेंबरला होणार आहे, तर कंपनीचे लिस्टिंग १८ तारखेला होणार आहे. Paytm ने IPO ची किंमत २०८० ते २१५० रुपये ठेवली आहे. बाजारात Paytm चा १८३०० कोटी रुपयांचा IPO जारी केला, ज्याला शेवटच्या दिवशी १.८९ पट सबस्क्रिप्शन मिळाले. त्यामुळे Paytm चा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO ठरला आहे, तर याआधी फक्त कोल इंडियाने १५०० कोटींचा IPO आणला आहे.