‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने शाळेत असताना म्हटलेली आहे. मात्र आज अनेक नकारात्मक बातम्या पहिल्यावर किंवा वाचल्यावर खरोखर लोकं असं का वागतात? धर्माच्या नावाने का भांडतात? असे प्रश्न सहज मनात डोकावून जातात. असे असले तरी आपल्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी वाईट नाहीत यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी एखादी घटना घडते आणि आपला पुन्हा माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म असल्याचा विश्वास दृढ होतो. असाच एक सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून नेटकरी या फोटोच्या प्रेमात पडले आहेत.

गणेशोत्सवाची मिरवणूक आणि मोहरमची मिरवणूक एकाच वेळी एकाच रस्त्याच्या दोन बाजूने जाताना क्लिक करण्यात आलेला एक फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. जॉय भट्टाचार्या यांनी केलेल्या ट्विटनुसार व्हायरल झालेला हा फोटो गुजरातमधील सिल्वासा येथील आहे. या फोटोमध्ये रस्त्याच्या एका बाजूने गणपतीची मिरवणूक तर दुसऱ्या बाजूने मोहरमचा जुलूस जाताना दिसत आहे. रस्त्यामधील दुभाजकावरुन काढलेल्या या फोटोमध्ये मुसलीम बांधव आणि हिंदू बांधव एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

हा फोटो ट्विटवर तसेच फेसबुकवर व्हायरल झाला आहे. अनेकांनी ‘हा आहे माझा भारत देश’ असं म्हणत हा फोटो शेअर केला आहे. तर काहींनी ही खरी धर्मनिरपेक्षता आहे असं सांगत हा फोटो शेअर केल्याचे दिसत आहे. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विटस


खरा भारत


भारत


हे चित्र कायम दिसू दे


दुसरी बाजू


भारताची संकल्पना


एकत्र भारत


पक्षही नाही धर्मही नाही केवळ माणूस


भारत


वा

१०
अभिमान

११
दिन बन गया मेरा तो

१२
माझा भारत

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील हुबळीमध्येही मोहरम आणि गणेश चतुर्थी एकाच मंडपात साजरी करुन स्थानिकांनी सामाजिक सलोख्याचा संदेश दिला होता.