Desi jugad Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाड व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात. त्यात जर हे जुगाडू पुणेकर असतील तर मग विचारायलाच नको. अशाच पुणेकर तरुणांचा जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याआधी तुम्ही अनेक वेगवेगळे जुगाड पाहिले असतील मात्र यापेक्षाही खतरनाक जुगाड समोर आला आहे. एका तरुणानं चक्क सायलेन्सर हातात धरुन गाडी चालवली आहे. होय, तुम्हाला विश्वास बसत नाहिये? तर मग व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच..हा व्हिडीओ पाहून तुमचेही मन थक्क होईल. जुगाड ही आम्हा भारतीयांची वेगळी कला आहे.  ही अनोखी स्कूटी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हिडीओमध्यो तुम्ही पाहू शकता, पुण्यात दोन तरुण स्कूटीवरुन जात आहेत. यावेळी एक जण स्कूटी चालवत आहे तर मागे बसणाऱ्या तरुणानं चक्क सायलेन्सर धरलं आहे. हे सायलेन्सर तुटल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात त्याला बांधलं आहे आणि त्याला दोरीनं बांधून पकडलं आहे. हा जुगाड पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. आता पुणेकरांची ही जुगाडू बाजूही पाहायला मिळाली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>मनालीमधील धडकी भरवणारे ७ सेकंद! ड्रायव्हरच्या एका निर्णयानं मृत्यू रोखला; VIDEO पाहाल तर मनालीचा प्लॅन कॅन्सल कराल

सोशल मीडियावर @framingpune नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.